funeral procession of Assistant Police Inspector Sudarshan Dater, who died after a tree fell on a police vehicle near Erandol, was held on Friday. esakal
नाशिक

Nashik News : सुदर्शन दातीर यांच्यावर नाशिकमध्ये अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘अमर रहे, अमर रहे, सुदर्शन दातीर अमर रहे’च्या घोषात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यावर शुक्रवारी (ता. ३०)अंबडगाव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खांदा दिला, तेव्हा अश्रूंचा रोखून धरलेला बांध फुटला अन् सारेच शोकसागरात बुडाले. (Sudarshan Dater cremated in Nashik news)

श्री. दातीर जळगाव जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेत होते. गुरुवारी (ता. २९) ते एरंडोल-कासोदा रस्त्याने शासकीय वाहनातून जात असताना पथकाच्या वाहनावर अंजनी धरणाजवळ रस्त्यावर गुरुवारी रात्री झाड कोसळल्याने दोन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यात सुदर्शन दातीर यांचा समावेश होता. ते नाशिकच्या अंबडगाव येथील रहिवासी आहेत.

अंत्यसंस्कारावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. गुरुवारी त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच संपूर्ण अंबड गावावर शोककळा पसरली होती. अंबड ग्रामस्थ लागलीच जळगावकडे रवाना झाले होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मृतदेह अंबड येथील निवासस्थानी आणल्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आमदार सीमा हिरे, नाशिक परिक्षेत्राचे विषेश पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, साहेबराव दातीर, दिलीप दातीर, राकेश दोंदे, दीपक दातीर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सुदर्शन दातीर यांच्यामागे आई, वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा ते पोलिस अधिकारी अशी ओळख तयार केलेल्या, गोरगरिबांसाठी स्वतःच्या पगारातून वस्तू विकत घेऊन सढळ हाताने मदत करणे असो वा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च असो सुदर्शन यांचा पुढाकार असायचा. मानमिळाऊ स्वभावाने त्यांनी अनेकांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

मेहनतीने मिळाली बढती...

सुदर्शन दातीर ऑक्टोबर २०१२ मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. त्यांनी महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमी सांगली येथे एक वर्षाचे प्रशिक्षणही घेतले होते. यानंतर मुंबई येथे त्यांना नियुक्ती मिळाली होती. त्यांनी तेथे सात वर्षे काम केले. यानंतर त्यांना बढती मिळाल्याने ते २०१९ पासून जळगाव येथे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT