Shop Fire News esakal
नाशिक

Nashik News : कोकणगाव फाट्यावर असलेले हाराळे शॉपिंग सेंटर ला अचानक लागली आग

सकाळ वृत्तसेवा

कोकणगाव : येथील द्राक्ष व्यापारी मुन्ना सय्यद यांच्या दुकानात रविवारी (ता. ५) दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली. या वेळी दुकान बंद असल्याने आतून अचानकपणे धूर येऊ लागल्याने हा प्रकार लक्षात आला.

या दुकानात असलेले डाळिंबाच्या पॅकिंगसाठीचे मटेरियल व द्राक्ष पॅकिंगसाठी लागणारे कागदी कतरण, लाकडी बॉक्स, कॅरेट जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसपाटील तुकाराम पवार यांनी याबाबत पोलिसांना कळविले. (Sudden fire broke out at Harale Shopping Center on Kokangaon Phata Nashik news)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

त्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाची गाडीही या वेळी घटनास्थळी दाखल झाली.

साधारण दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. साधारणत: पन्नास ते साठ हजारांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. सरपंच, पोलिस नाईक दीपक निकुंभ, योगेश हेंबाडे आदींसह नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Explosion News : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

सनी देओलच्या अफेअरवर काय होती पत्नी पुजा देओलची प्रतिक्रिया? अभिनेता म्हणाला...'तिला जेव्हा हे सगळं..'

Publishing Industry : मराठी पुस्तक महोत्सवात नव्या लेखकांचा उदय; वाचकांचा कल जुन्या लेखकांकडे

इस्रायलनं हल्ला करताच इराणचा मोठा निर्णय; भारताला बसणार फटका, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार?

Gold Silver Rate : युद्धाच्या वणव्याने सोने-चांदीच्या दराचा भडका, एका दिवसात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT