नाशिक : महापालिकेची विविध कामांचा ठेका नगरसेवक पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेच्या उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना जिल्हा न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात बडगुजर यांनी अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात धाव घेतली असता त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. (Sudhakar Badgujar Fraud Case granted interim bail Court relief in embezzlement cases Nashik Crime)
गेल्या १७ तारखेला सरकारवाडा पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
२०१६ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रार अर्जांची ‘लाचलुचपत’च्या पथकाने खुली चौकशी करून तपासीअंती गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी बडगुजर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपहाराच्या चौकशीसाठी नोटीस दिली असता, त्यांनी कागदपत्रांचे कारण देत 10 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर बडगुजर यांना अटक होण्याची शक्यता असल्याने बडगुजर यांनी जिल्हा न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी (ता 29) न्यायालयात सुनावणी झाली.
बडगुजर यांच्या तर्फे जेष्ठ विधींज्ञ ऍड. एम. वाय. काळे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने बडगुजर यांना अटकेपासून संरक्षण देत अटी शर्थीच्या अधीन राहत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे बडगुजर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.