Sudhakar Badgujar has claimed that many BJP members are in touch with Shiv Sena nashik marathi news 
नाशिक

नाशिकमध्ये भाजपला खिंडार? अनेकजण शिवसेनेच्या संपर्कात; महानगरप्रमुख बडगुजर यांचा दावा

विक्रांत मते

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने संघटना बळकटीवर भर दिला असून, सलग दुसऱ्या दिवशी चार नवीन शाखांचे उद्‌घाटन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे अनेकजण शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. 

बडगुजर म्हणाले, की शहरात शिवसेनेचा सुरू असलेला झंझावात बघता विरोधकांनी त्याचा धसका घेतला आहे. भाजपचे अनेकजण शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे शिवसेनेला सध्या चांगले दिवस आहेत. राज्यात शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने जमेची बाजू असून, त्याचा लाभ उचलून शिवसेना कार्यकर्त्यांनी सरकारची कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोचवावेत. महानगरप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध बैठका घेतल्यानंतर पक्षाचा सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका जिंकायाच्याच असा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. 

शहरात शाखांचे उद्‌घाटन 

पंचवटी विभागातील पेठ रोडवरील मेहेरधाम बसस्टॉप, बोरगड चौफुलीवरील शिवतेजनगर, दिंडोरी रोडवरील कसांरामाता चौक, रिलायन्स चौफुली या शाखांचे उद्‌घाटन बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होतेकार्यक्रमास विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, गटनेते विलास शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर, दिलीप मोरे, बाळासाहेब कोकणे, रुपेश पालकर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव ठाकरे, महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर, मंगला भास्कर, श्यामला दीक्षित, राजू लवटे, महानगर संघटक दिगंबर मोगरे, राहुल दराडे, विधानसभाप्रमुख नितीन चिडे, योगेश बेलदार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT