majur.jpg 
नाशिक

गावी परतल्याचे हसू चेहऱ्यावरच आटले अन् घरात पाऊल टाकायच्या आधीच वेशीवर क्वारंटाईन!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (गुगूळवाड) लॉकडाउनमुळे गुजरातला मजुरीसाठी गेलेल्या त्या कामगारांच्या चेहऱ्यावर कामगार दिनाच्या दिवशी हसू फुलले...काल रात्री वाहनाने गुगूळवाड या मुळगावी सोडण्यात आले. सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून सदर मजुरांना शेती शिवारातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

ऊसतोडणी कामगारांच्या मनात आंनदाचे वातावरण

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुजरात येथे सुमारे 87 ऊसतोडणी मजूर गेले होते. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे अडकून पडले होते. गावी येण्यासाठी व्यवस्था होत नसल्याने तसेच कुटुंबातील सदस्यांची खाणा पिण्याच्या समस्यांनी वयोवृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिला त्रस्त झाला होत्या. ऊसतोडणी कामगार यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते आर.डी.निकम यांना फोन करून आपल्या व्यथा मांडली. निकम यांनी सदर कामगारांना घेऊन येण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार चंद्रजीतसिंह राजपूत यांच्याकडे केली असता. संबंधित कामगारांनची यादी घेऊन प्रशासकीय परवानगीसाठी प्रयत्न सुरू करीत असतांनाच केंद्र सरकारने स्थलांतरीत मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी योग्यती काळजी घेऊन परवानगी देण्याचे घोषित केलाने मंजुराचा गावी येण्याचा मार्ग मोकळा झालाने ऊसतोडणी कामगारांच्या मनात आंनदाचे वातावरण निर्माण झाले. कामगारदिनाच्या दिवशी ऊसतोडणी कामगार गावी परत आल्याचे चेहऱ्यावर हस्य होते. 

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवस शेती शिवारात राहून काढावे लागणार असल्याने तसेच उदरनिर्वाहासाठी कुटुंबाजवळ अन्य धान्य नसल्याने ग्रामस्थांनी अन्न धान्य जमा करून दिले. तर निकम यांनी इतर दैनंदिन खर्चासाठी पाच हजार रुपयांची मदत केल्याने मोठ्या दिलासा मिळाला. मात्र सदर कुटुंबातील सदस्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात प्रवेश न देता स्वतंत्र विलिनीकरण कक्षात काही दिवस काढण्यासाठी आग्रही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT