Hiraman Lavand esakal
नाशिक

सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या; आत्महत्येपुर्वी केला Video शुट

उत्तम गोसावी : सकाळ वृत्तसेवा

ओझर(जि. नाशिक) : सासरची मंडळी वेळोवेळी मारहाण करतात, मानसिक हिरामण लवांड त्रास देतात. या छळास कंटाळून येथील सोनेवाडी येथील हिरामण अशोक लवांड (वय ३९) याने विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.

आत्महत्या करण्यापूर्वी हिरामण लवांड याने व्हिडिओ करत आपली खदखद व्यक्त केली. पोलिसांनी मयत हिरामण लवांड याचा मुलगा ऋतिक लवाड याच्या फिर्यादीवरून सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हादाखल केला. (Suicidal due to torture by in laws Video viral shot before suicide Nashik latest marathi news psl98)

गेल्या काही महिन्यांपासून हिरामणचे सासरे बाबूराव केरू चव्हाणके, शालक किरण बाबूराव चव्हाणके (रा. किर्तागळी, ता. सिन्नर) व शुभम गोविंद ढोबळे (रा. म्हाळसाकोरे, ता. निफाड) व एक अज्ञात इसम असे चौघे हिरामण यास सातत्याने मारहाण करून त्याचा छळ करीत होते. अखेर या छळास कंटाळून हिरामण लवांड याने मंगळवारी (ता. २३) विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मयत हिरामण लवांड यांच्या मुलगा ऋतिक लवांड याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हिरामण लवांड यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...अन् अश्रू झाले अनावर आत्महत्या करण्यापूर्वी मृत हिरामण लवांड यांनी व्हिडिओ करीत आपल्यावर होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाची आपबिती रडतरडत कथन केली. आत्महत्येस सासरे बाबूराव चव्हाणके, किरण चव्हाणके शुभम ढोबळे हे जबाबदार असून, यात अजून एक इसम असून त्यांचे नाव घेतल्यास तो माझ्या मुलांना त्रास देईल. अंत्यविधीस आपल्या सासरच्या मंडळींना येऊ देऊ नये, असे सांगताना हिरामण लवांड यांना अश्व अनावर झाले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT