suicide by hanging esakal
नाशिक

बहिणीशी चॅटिंगची कुरापत काढत मारहाण; दहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

धनंजय वावधने

सोग्रस (जि. नाशिक) : आपल्या बहिणीशी मोबाईलवरून चॅटींग (Chatting) केल्याच्या वादातून मारहाण करीत जीवे मारण्याच्या धमकीला घाबरून दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरूवारी (ता. २८) चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे घडली. याप्रकरणी चांदवड पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (suicide of tenth grade student Nashik Suicide News)

याबाबत माहिती अशी की, तळेगाव रोहि येथील शुभम राजाराम वाकचौरे (वय १७) यास बहिणीशी चॅटिंग का करतो, अशी कुरापत काढत संशयितांनी मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे शुभमने घाबरून गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप वडिल राजाराम विश्‍वनाथ वाकचौरे यांनी फिर्यादीत केला. त्यावरून दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की दोन ते तीन दिवसांपासून गावातील एकाने दुसऱ्याला सिमकार्ड (Simcard) देऊन स्वतःच्या बहिणीच्या नावाने व्हाट्सअप (Whatsapp), इंस्टाग्राम (Instagram) ग्रुपवर शुभमने खोटे चॅटिंग केल्याची कुरापत काढून संशयित मंगळवारी (ता. २६) रात्री साडेआठच्या सुमारास घरी येत शुभमला मारहाण केली. मुलीच्या वडिलांनीही शुभमच्या कुटुंबियांना धमकी दिली. रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा दहा मुलांनी शुभम व कुटुंबियांना मारहाण केली. त्यानंतर २७ एप्रिलला शुभमला व्हाट्सअपवरून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शुभमने घाबरून गुरुवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी पोलिसांनी विजय बाळासाहेब भोकनळ, योगेश रमेश वाकचौरे, गणेश बाळू सोनवणे, अक्षय जेऊघाले (सर्व रा. निमगाव वाकडा, ता. निफाड), गोकुळ बबन भोकनळ, बाळासाहेब रामदास भोकनळ, आकाश भोकनळ, अमोल युवराज भोकनळ (सर्व रा. तळेगाव रोही) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Pradesh High Court: मानवी दात धोकादायक शस्त्र नाही’ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय

मातीत राबणारेच मातीला मिळाले! महाराष्ट्रात 8 महिन्यांत तब्बल 1183 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, धक्कादायक आकडेवारी समोर...

Explained: बदलत्या वातावरणाचा लहान मुलांना कोणते आजार होतात अन् सर्दी- खोकल्यार आयुर्वेदानुसार कोणते घरगुती उपाय केले पाहिजे? वाचा डॉक्टर काय सांगतात

Pregnant Woman Killed : पतीकडून गर्भवती पत्नीचा मोटारीने उडवून खून, अपघात भासविण्याचा प्रयत्न; सासू, पतीकडून वारंवार छळ

France Mosque Incident : धक्कादायक! नऊ मशिदींबाहेर आढळली डुकरांची मुंडकी; पाच मशिदींवर राष्ट्रपतींचं निळ्या रंगात लिहिलं नाव, मुस्लिम समाजात तीव्र संताप

SCROLL FOR NEXT