Onion  esakal
नाशिक

Onion Rate : उन्हाळी कांद्याच्या भावाचा ‘टॉप गिअर'; दुबई, सिंगापूर, बांगलादेश निर्यातीने शुल्क अस्त्र निष्प्रभ

सकाळ वृत्तसेवा

Onion Rate : देशातंर्गत कांद्याच्या उपलब्धतेसाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क ४० टक्के लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तान, तुर्कस्तान, पाकिस्तानमधील कांद्याची उपलब्धता नसल्याने दुबईसह सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सुरू राहिल्याने केंद्राचे निर्यातशुल्काचे अस्त्र निष्प्रभ ठरले. या एकूण स्थितीत उन्हाळी कांद्याच्या भावाने ‘टॉप गिअर' टाकला असू तो तीन हजाराच्या आसपास पोचला आहे.

लासलगावमध्ये शनिवारी (ता. १४) २ हजार ५२५ रुपये क्विंटल सरासरीने उन्हाळी कांद्याची विक्री झाली होती. सोमवारी (ता.१६) क्विंटलचा इथे सरासरी भाव ३ हजार रुपये राहिला. पिंपळगाव बसवंतमध्ये २ हजार ६५० रुपये क्विंटलने शनिवारी विक्री झाली, सोमवारी २ हजार ८५० रुपये क्विंटल असा सरासरी भाव इथे मिळाला. (summer onion rate hike to 3000 nashik news )

देवळा, नामपूर, नाशिक बाजारात क्विंटलभर कांद्याचा सोमवारचा सरासरी भाव २ हजार ८०० रुपये असा राहिला आहे. इतर बाजारपेठांमधील सोमवारचे क्विंटलचे सरासरी भाव रुपयांमध्ये असे : मुंगसे-२ हजार ७५०, कळवण-२ हजार ६०१, चांदवड-२ हजार ६५०, कोल्हापूर-२ हजार २००, मुंबई-२ हजार १००, सातारा-१ हजार ९००, पुणे-२ हजार १००, नगर-२ हजार ७००, वैजापूर-अडीच हजार.

नवीन कांद्याला महिन्याचा विलंब

खरीपामध्ये नवीन लाल कांदा उन्हाळी कांद्याच्या अंतिम टप्प्यात बाजारात येण्यास सुरवात होते. मात्र नवीन लाल कांद्याची सध्या आवक सुरु झाली असली, तरीही प्रमाण खूपच कमी आहे. ती वाढण्यासाठी आणकी महिना लागू शकतो. त्यातच पुन्हा खरीप आणि लेट खरीप कांद्याचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात घटले आहे.

सोमवारी (ता. १६) सोलापूरमध्ये १ हजार ९००, बारामतीमध्ये २ हजार, जळगावमध्ये १ हजार ६५०, पेणमध्ये ३ हजार ४००, साक्रीमध्ये ३ हजार २४० रुपये क्विंटल या सरासरी भावाने नवीन लाल कांद्याची विक्री झाली.

मोठ्या आकाराच्या कांद्याची निर्यात

अफगाणिस्तानमधील भूकंप, तुर्कस्तान आणि पाकिस्तानमधील कांदा संपल्याने आता आखाती देशासह इतर देशांमध्ये मोठ्या आकाराच्या उन्हाळी कांद्याची मागणी वाढली आहे. बांगलादेशसाठी ३ दिवसांमध्ये १०० ते १५० ट्रकभर कांदा रवाना झाला आहे. श्रीलंकासाठी आठवड्यातून दोन ऐवजी एक जहाज रवाना झाले आहे.

त्यात १२७ कंटेनरभर कांदा होता. सिंगापूरसाठी ६ आणि मलेशियासाठी २० कंटेनर पाठवण्यात आल्याचे निर्यातदारांनी सांगितले. सोमवारचा टनभर कांद्याचा दुबई आणि श्रीलंकासाठी ६०० ते ६१०, बांगलादेशसाठी ६२० ते ६३० आणि सिंगापूरसाठी २५०, मलेशियासाठी ६१० डॉलर असा भाव राहिला आहे.

बाजारात अफवांचे पेव

- भाववाढीमुळे साठवणूक मर्यादा लादत यंत्रणांकडून तपासणी होणार?

- निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरुन वाढवण्याचा विचार होणार काय?

- नवीन कांद्याच्या विलंबामुळे निर्यात बंदीचा पुन्हा विचार होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईकरांचा घराणेशाहीला दणका! दिग्गज नेत्यांच्या घारातील सदस्य पराभूत

Pune Municipal Election Result राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या प्रशांत जगताप यांचा भाजपला धक्का, मित्राचा पराभव करत मारली बाजी

Nashik Municipal Election Results 2026 : नाशिक महानगरपालिका निवडणूक मतमोजणीचे पहिले कल समोर; भाजप अन् शिवसेनेची 'इतक्या' जागांवर आघाडी

PMC Election Results : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग २५ मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ; EVM क्रमांक न जुळल्याने रूपाली ठोंबरे आक्रमक

मुंबईत पहिला विजय काँग्रेसचा, भाजपचे नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर विजयी; आतापर्यंत कुणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT