Suspect Vijayakumar Mundaware esakal
नाशिक

Nashik Crime: 5 महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा भामटा जेरबंद; नोकरीचे आमिष दाखवून घातला 6 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : इंडीया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सहा लाखांना गंडा घालणाऱ्या संशयिताला पाच महिन्यांनी अटक करण्यात आली.

इंदिरानगर पोलिसांना सतत हुलकावणी देणार्यास गोविंदनगर परिसरातून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यास तीन दिवसांची कोठडी सुनावली. (suspect jailed for evading police for 5 months 6 lakhs of money was given by showing lure of job Nashik Crime)

विजयकुमार मुंडावरे (रा. गणनायक अपार्टमेंट, गोविंदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. राजेंद्र बबनराव जगताप (रा. चेतनानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलीस नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संशयित मुंडावरे याने ६ लाख रुपये घेतले होते.

परंतु नोकरी लावून देत उलट पैशांची मागणी करीत, संशयिताने शिवीगाळ करून दमदाटी केली. सदरचा प्रकार जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२१ या दरम्यान घडला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गेल्या मे महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित मुंडावरे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो सतत पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर मुंडावरे त्याच्या गोविंदनगरमधील राहत्या घरी आला असल्याची खबर मिळाली असता, इंदिरानगर पोलिसांनी शिताफीने त्यास अटक केली.

त्यास न्यायालयात हजर केले असता, त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक उघडे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT