A team of the Central Crime Branch with the detained female suspect in the Honey Trap case. esakal
नाशिक

Honey Trap Case : हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित महिलेस अटक

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित महिलेस मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. यापूर्वी दोन संशयितांना अटक केली आहे. मुख्य संशयित इम्रान इनामदार (रा. साईनाथनगर, इंदिरानगर) आणि अन्य तीन संशयित महिलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (Suspect woman arrested in honey trap case Nashik Crime News)

संशयित इम्रान इनामदार (रा. साईनाथनगर, इंदिरानगर) याने त्याच्या सहकारी पुरुष आणि महिलांसह वडाळा गावातील नासिर खान यांना चारचाकी विक्री करण्याचा बहाणा करून त्र्यंबकेश्वरलगत असलेल्या निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यास पिण्याच्या पाण्यामधून गुंगीचे औषध दिले. नासिर बेशुद्ध होताच त्याचे तरुणीसह अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत काढले. त्यांना प्रसारित करण्याची धमकी देत त्याच्याकडून सुमारे ९५ हजारांची रक्कम उकळली. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यातील संशयित महिला महामार्ग बसस्थानकावर येत असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे हवालदार शेरखान पठाण आणि पोलिस नाईक संदीप पवार यांना मिळाली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनात शेरखान पठाण, संजय गामने, संदीप पवार, महिला अंमलदार वैशाली घरटे यांच्यासह पथकाने बसस्थानक आवारात दाखल होत संशयित महिलेस ताब्यात घेतले. चौकशीअंती तिने गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

यापूर्वी मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून सोनू ऊर्फ बालेश नरहरी देशमुख (वय ३५, रा. नैताळे, ता. निफाड, हल्ली पांडवनगरी), अविनाश विजेंद्र परदेशी (रा .द्वारका) संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मुख्य संशयित इम्रान इनामदार याच्यासह अन्य तीन संशयित महिला फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अशाप्रकारे महिला संशयितांचा वापर करत हनी ट्रॅपच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची लूट करण्याचे प्रकार सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे सरन्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! अखेर सायन आणि विद्याविहार उड्डाणपूल खुले होणार, उद्घाटनाचा मुहूर्तही ठरला

विद्यार्थ्यांसमोर झुकलं झारखंड सरकार; JPSC परीक्षा रद्द करण्याचं आश्वासन, ९० दिवसांत CID चौकशी

August Horoscope: अखेर प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्ये ‘या’ राशींची रखडलेली कामं मार्गी, पैशांसह मिळणार मोठी खुशखबर

Marathi News Live Updates : इस्रायलमध्ये सैनिकांच्या सर्व सुट्ट्या रद्द, इराणवर पुन्हा हल्ल्याची तयारी? मोठी अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT