neibours murder.jpg 
नाशिक

धक्कादायक प्रकार : 'तू आमच्या भांडणात नको पडू, तू तुझं बघ!'...अन् कोणाला काही कळायच्या आत त्याने...

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) येथील गवळी वाडा भागातील शेख रफीक शेख इस्माईल हा त्याच्या मुलीस मारहाण करीत असतांना शेजारी राहणारे ताहीर हुसेन अख्तर (४१) घराबाहेर येऊन आरडाओरड का होत आहे हे पाहण्यासाठी गेले. आपल्या घरातील भांडण सोडविण्यासाठी आल्याचा संशय आल्याने ताहीर हुसेन यांना शिवीगाळ करत रफीकने त्यांच्या छातीत चाकूने वार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. २२) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर रफीक शेख फरार असून त्याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

अशी घडली घटना

येथील गवळीवाडा भागात ताहीर हुसेन अख्तर व शेख रफीक शेख इस्माईल उर्फ राजा हे दोघे यंत्रमाग कामगार शेजारी राहतात. रफीक हा नेहमी ताहीरशी वाद घालत त्यांना शिवीगाळ करत असे. शनिवारी (ता. २२) रात्री पाऊणेअकराच्या सुमारास ताहीर हुसेन व त्यांची पत्नी रुक्साना घरात गप्पा मारीत होते. त्याचवेळेस शेजारी राहणारा शेख रफीक हा त्याची मुलगी सना हिला मारहाण करीत होता. जोरजोरात ओरडण्याचा आवाज आल्याने पती-पत्नी बाहेर आले. ताहीर हा भांडण सोडविण्यासाठी आल्याचा रफीकचा समज झाला. ‘तू हमारे झगडे में गिर मत, तू तेरा देख’ असे त्याने सांगितले. यावर ताहिरने भांडण करु नको. तुझ्या भांडणाच्या आरडाओरडीचा त्रास इतर लोकांना होतो असे समजावून सांगितले. याचा राग आल्याने रफीक ताहीरच्या अंगावर धावून गेला. आरडाओरड करत त्याने शिवीगाळ सुरु केली. त्याच वेळेस शेजारी राहणाऱ्या शायदा व शबाना या महिलांनी रफीकला शिवीगाळ करु नको असे समजावून सांगण्या चा प्रयत्न केला. मात्र, रागात असलेल्या रफीकने कोणाला काही कळण्याच्या आत पॅन्टमध्ये असलेला चाकू काढून ताहीरच्या छातीत वार केला. चाकूचा वार खोलवर गेल्याने ताहीर जमिनीवर कोसळले. त्यांची पत्नी रुक्सानाबानो हिलाही रफीकने मारहाण केली. 

जावीद अख्तर व नासीर अन्सारी यांनी ताहीरला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ताहीर यांच्या मागे वडील, पत्नी, भाऊ, दोन मुले व चार मुली असा परिवार आहे. शहर पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला. पोलिस फरार शेख रफीकचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT