shymchi-aai-.jpg 
नाशिक

अत्यंत घृणास्पद! "श्यामच्या आई" चे विकृत मिम्स बनविणे बंद करा...नाहीतर...

राजेंद्र दिघे

नाशिक / मालेगाव कॅम्प : ‘श्यामच्या आई’वरील विकृत मिम सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. गटारी अमावस्येच्या निमित्ताने या दोघांच्या तोंडी विकृत संवाद दाखवून हे मिम व्हायरल झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचीही आता मोहीम सुरू झाली आहे. अनेकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना इमेल पाठविण्यात येत आहेत.

साने गुरुजी आणि त्यांची आई या दोन्ही चरित्रांचा अपमान

उभ्या महाराष्ट्राला आदर्श असे संस्कार देणारी श्यामची आई आणि स्वातंत्र्यसैनिक महाराष्ट्र माउली साने गुरुजी यांच्याबद्दल असे विकृत मिम्स बनवून फिरवणाऱ्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करून शिक्षा द्यावी, असेही या निवेदनात नमूद केले आहे. या कृत्याचा राज्यभरातून राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, विविध संस्था, सर्वसामान्य नागरिकांनी निषेध केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाने अनेक पिढ्या सुसंस्कारित केल्या आहेत. या पुस्तकातील चित्राचा वापर करून अंत्यत घृणास्पद असे मिम्स बनवून समाजकंटक ते सोशल मीडियावर फिरवत आहेत. हा साने गुरुजी आणि त्यांची आई या दोन्ही चरित्रांचा अपमान असून, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

 ‘श्यामची आई' ने केले अनेक पिढ्यांवर संस्कार

साने गुरूजी हे महाराष्ट्रातील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होय. त्यांनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाने गेली ८५ वर्षे महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांवर संस्कार केले आहेत. श्याम आणि त्याची आई यांचा एकमेकांशी असलेला संवाद अनेक पिढ्यांना जीवन जगण्याची दिशा देतो आहे. यावर आचार्य अत्रे यांनी चित्रपट काढला. या चित्रपटातील श्याम आणि त्याची आई यांचे चित्र महाराष्ट्रात अनेक जण श्रद्धेने बघतात. त्यापासून प्रेरणा घेतात आपल्या मुलांना 'श्यामची आई' हे पुस्तक वाचायला देतात. अशा पार्श्वभूमीवर श्याम व त्याची आई यांचे छायाचित्र फोटोशॉप करून त्यावर अत्यंत विकृत मजकूर लिहिलेला सोशल मीडियात फिरतो आहे. बायकोला दारूचा वास येऊ नये आणि करोना होऊ नये म्हणून काय वापरशील? यावर श्याम 'मास्क' असे उत्तर देतो. असे मिम तयार करण्यात आले आहे. याला हरकत घेण्याचे कारण म्हणजे समाजामध्ये श्यामची एक सालस संस्कारित प्रतिमेचा आदर्श निर्माण झालेला असताना असले गलिच्छ संवाद त्यांच्या तोंडी देऊन प्रतिमा कंलकित करण्याचा हा प्रयत्न असल्याकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

(संपादन - ज्योती देवरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला महिलांना ३,००० रुपये मिळणार? फक्त एकच अडचण; पण कोणती? जाणून घ्या...

TET Result Date: टीईटी उमेदवारांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपर्यंत लागणार निकाल

Makar Sankranti 2026: एकाच दिवशी 4 दुर्मिळ योगायोग! सूर्यदेव कोणत्या वाहनावर होणार स्वार?

Nashik Municipal Election : दिवे कुटुंबाची 'सहावी' इनिंग; काँग्रेसचा हात सोडून हाती घेतले 'धनुष्यबाण' आणि 'कमळ'!

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' समारंभाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT