bribary.jpg 
नाशिक

शेतीच्या कामासाठी मागितली दोन हजारांची लाच; तलाठी गेला बाराच्या भावात

अशोक गवळी

सुरगाणा (नाशिक) : म्हसरूळ, नाशिक येथील रहिवासी व माणी (ता. सुरगाणा) सज्जात कार्यरत असलेले वर्ग तीनचे तलाठी शंकर संभाजी मायकलवाड (वय ५५) यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

माणी सज्जातील तलाठी लाच स्वीकारताना अटकेत 

बाफळून (ता. सुरगाणा) येथील २५ वर्षीय युवकाकडे त्याच्या आजोबांच्या नावे असलेल्या शेतीला वडिलांचे नाव लावण्यासाठी मायकलवाड यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित युवकाने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक युनिटचे पोलिस अधिकारी प्रभाकर निकम, पोलिस निरीक्षक संदीप साळुंके, पोलिस नाईक वैभव देशमुख, प्रभाकर गवळी, नितीन कराड, चालक हवालदार विनोद पवार आदींच्या पथकाने बुधवारी (ता. २८) सुरगाणा येथे सापळा रचून मायकलवाड यांना लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात उशिरापर्यंत कायदेशीर कारवाई सुरू होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT