suhas kande latest marathi news esakal
नाशिक

Nashik News : नांदगावला हद्दवाढीसह नळपाणी पुरवठा योजना; कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

सकाळ वृत्तसेवा

संभाव्य हद्दवाढीचा नकाशा. (फोटो घ्यावा)

नांदगाव (जि. नाशिक) : शहराच्या नागरी विकासासाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रफळातील वाढीसाठी आवश्यक असलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असून गिरणा धरणातील स्वतंत्र समांतर नळपाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावालाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने मान्यता दिली. या निर्णयामुळे शहर व तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे. (Tap water supply scheme with extension to Nandgaon Kande pursuit of success Nashik News)

शहराच्या नागरी विकासासाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रफळातील वाढीसाठी आमदार सुहास कांदे हे मागील वर्षापासून पाठपुरावा करत होता. नगरविकास विभागाकडे हद्दवाढीच्या प्रस्तावाचे घोंगडे गेल्या वर्षांपासून भिजत पडले होते. पालिकेच्या मावळत्या सभागृहाने आपल्या कार्यकाळ संपताना एकमुखी सहमतीचा ठराव दिल्यानंतर नांदगाव शहराची हद्दवाढीचा मुद्दा चर्चेला आला होता.

नागरी क्षेत्राजवळील स्वतंत्र ग्रामपंचायतीवर निधीचा होणारा अपव्यय व पालिकेला विकासकामे करताना पडणाऱ्या क्षेत्रफळातील भौगोलिक मर्यादा या बाबीचा सारासार विचार करीत हद्दवाढ करण्यात यावी ही मागणी वर्षानुवर्षे सुर होती. यासाठी आमदार कांदेंकडून सतत पाठपुरावा केला जात आहे. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळत आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हद्दवाढीच्या प्रस्तावातील त्रुटी तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी देखील हद्दवाढसाठीचा अनुकूल अभिप्राय शासनाला सादर केला आहे. त्यामुळे नांदगावला नववर्षात मुख्यमंत्र्यांची संमती मिळताच हद्दवाढ प्रस्ताव संमत होण्याची चिन्हे आता दृष्टीक्षेपात आली आहेत.

शहराच्या हद्दवाढ सोबतच शहरासाठी महत्त्वाची ठरलेल्या गिरणा धरणातील स्वतंत्र समांतर नळपाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावालाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने मान्यता दिल्याने हद्दवाढीसोबतच शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला देखील चालना मिळाली आहे. शहराच्या नगररचना आराखड्यातील तरतुदीचा लाभ घेत ग्रामपंचायत हद्दीत रेडी रेकनर ने होणाऱ्या व्यवहारांना देखील नजीकच्या काळात सुगीचे दिवस आले आहे.

"शहराचा विकास करताना क्षेत्रफळाची येणारी अडचण दूर करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून केलेल्या पाठ पुरव्याला यश मिळाले याचा आनंद आहे. शिवाय स्वतंत्र पाणी पुरवठा योजनाही मार्गी लागत असल्याचे समाधान आहे" - आमदार सुहास कांदे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT