Hayna Killed in accident esakal
नाशिक

Nashik News : समृद्धीवर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील सोनारी ते गोंदे दरम्यान दडुबेरे गावाच्या शिवारात समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस या जंगली श्वापदाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

विशेष म्हणजे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील हा रस्ता सामान्य वाहतुकीसाठी अद्याप खुला झालेला नाही. महामार्गाच्या कामावर असणारी अवजड वाहने व परिसरातील स्थानिकांची वाहने वगळता या मार्गावर अन्य वाहने ये-जा करीत नसल्याने अपघात कोणत्या वाहनाने केला असावा याबाबत संशय आहे. (tara killed in collision with unknown vehicle on Samruddhi mahamarg Nashik News)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत निर्माण करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नागपूर या पहिल्या टप्प्याचे गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

शिर्डी ते मुंबई दरम्यान दुसऱ्या टप्प्यात काम अपूर्ण असल्याने हा टप्पा वाहतुकीसाठी सर्वसामान्य वाहनांना बंद आहे. सिन्नर तालुक्यातील पाथरे ते सोनारी दरम्यान पॅकेज 12 अंतर्गत महामार्गाचे काम पूर्णत्वास गेलेले आहे. सद्यस्थितीत या रस्त्यावर केवळ ठेकेदार कंपनीचे अवजड वाहने व काही अंशी रस्ता मिळेल तेथून स्थानिकांची वाहने येजा करतात.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

बुधवारी सकाळी गोंदे ते सोनारी या गावांच्या दरम्यान डुबेरे शिवारात समृद्धी महामार्गावर तरस या जंगली श्वापदाचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या या तरसाला धडक देऊन जखमी केले व रक्तस्राव होऊन या तरसाचा मृत्यू झाला.

अपघात झालेल्या भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. असे असताना तरस महामार्गावर आले व अपघाताचा बळी ठरले. या संदर्भात सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्याकडे चौकशी केली असता वनविभागाचे कर्मचारी अपघातस्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून अपघाताचे नेमके ठिकाण व इतर माहिती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT