Electonic vehicle charging station  esakal
नाशिक

NMC Charging Station: ईलेक्ट्रीकल चार्जिंग स्टेशनला टाटा, रिलायन्सचा Bye-Bye! या नव्या कंपन्यांचा सहभाग

पुनर्निविदा

विक्रांत मते

NMC Charging Station : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण अंतर्गत महापालिकेतर्फे शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्यासाठी सात आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी रस दाखविला आहे.

पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने राबविलेल्या निविदांची तांत्रिक छाननी सुरु आहे. यापुर्वीच्या निविदा प्रक्रियेत टाटा व रिलायन्स या आघाडीच्या कंपन्यांनी रस दाखविला होता.

परंतू, आता त्याऐवजी अन्य सात कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याने टाटा, रिलायन्सची माघार कशामुळे झाली हा संशोधनाचा भाग ठरणार आहे. (Tata Reliance out from NMC Electrical Charging Station Participation of new companies nashik news)

पारंपरिक इंधनावर होणारा खर्च, त्यामुळे वाढणारी महागाई व वाहनांची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत असताना तेवढ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशनचीदेखील आवश्यकता भासणार आहे.

त्या अनुषंगाने महत्त्वाच्या शहरांमध्ये केंद्र शासनाने चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निधी दिला आहे. महापालिकेने २२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी यादी सादर केली. तर नॅशनल क्लीनर पॉलिसी अंतर्गत (एन कॅप) ३५ जागांवर चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ५७ जागा चार्जिंग स्टेशनसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ईव्ही स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रिबीड मिटींगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्यांनी नाशिकमध्ये काम करण्याची तयारी दर्शविली.

यात टाटा पॉवर, टायर रेक्स ट्रान्समिशन प्रा. लि., एनर्जी सोल्युशन्स, रिलायन्स जिओ, बीपी बग, इनोझा लिमिटेड, निना हँड्स इव्हिगो चार्ज प्रा. लि., रेशनसॅन टेक इलेक्ट्रिकल्स, राजसन इलेक्ट्रॉनिक्स, एस अँड टी प्रा. लि., पुनम वेंचर्स इंडिया प्रा. लि., युनिक एंटरप्राइजेस, लॅब्स डब्ल्यूबीआय इंडस्ट्रीज या कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

परंतू, विद्युत विभागाने नव्याने निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिल्यानंतर पुर्वीच्या कंपन्यांऐवजी अन्य कंपन्यांनी ईलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सहभाग नोंदविल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आता या नवीन सात कंपन्या

पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार असून, निविदा प्रक्रियेला ३० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती.

या मुदतीत निना हॅण्डस्, मरिन इलेक्ट्रीकल्स प्रा. लि., टेस्को चार्ज झोन लिमिटेड, मावेन कार्पोरेशन, शरिफाय सर्व्हिसेस प्रा. लि., जिवाह इंटरनॅशनल प्रा. लि., तसेच युनिक एंटरप्रायझेस या सात कंपन्यांच्या निविदा सादर झाल्या आहेत.

"पहिल्या टप्प्यातील वीस चार्जिंग स्टेशनसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्यांनी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी दाखविली. परंतू, त्यानंतर अन्य कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. रिलायन्स, टाटा कंपन्यांनी माघार का घेतली, हे सांगता येणार नाही. मात्र, अन्य कंपन्यांशी टाय-अप करण्याची शक्यता आहे."

-उदय धर्माधिकारी, अधिक्षक अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.

विभागनिहाय चार्जिंग स्टेशन

६० किलो वॅट (चार चाकी) ३.३ किलोवॅट (दोन व तीन चाकी)

* राजीव गांधी भवन १ ५
* पश्‍चिम विभागीय कार्यालय १ ५
* पूर्व विभागीय कार्यालय १ ५
* नाशिक रोड विभागीय कार्यालय १ ५
* सातपूर विभागीय कार्यालय १ ५
* पंचवटी विभागीय कार्यालय १ ५
* सिडको विभागीय कार्यालय १ ५
* तपोवन बस डेपोजवळ १ ५
* अमरधाम फायर स्टेशन पंचवटी १ ५
* सातपूर फायर स्टेशन १ ५
* राजे संभाजी स्टेडियम सिडको १ ५
* बिटको हॉस्पिटल १ ५
* कृषीनगर जॉगिंग ट्रॅक १ ५
* बी. डी. भालेकर शाळा पार्किंग १ ५
* प्रमोद महाजन उद्यान १ ५
* महात्मानगर क्रिकेट मैदान १ ५
* दादासाहब फाळके स्मारक १ ५
* गणेश वाडी भाजी बाजार इमारत १ ५
* लेखानगर महापालिका जागा १ ५
* अंबड लिंक रोडवरील महापालिका मैदान १ ५
---
एकुण २० १००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT