Nashik municipal corporation
Nashik municipal corporation 
नाशिक

देवळाली टीडीआर घोटाळा चौकशीला सुरुवात; मुद्रांक महानिरीक्षकांमार्फत दराची होणार तपासणी 

विक्रांत मते

नाशिक - महापालिकेचे शंभर कोटी रुपयांचे नुकसान करण्यास कारणीभुत ठरलेल्या देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक २९५ सह रेल्वे साठी महापालिकेने देण्यात आलेल्या टिडीआर घोटाळ्याच्या चौकशीला समितीला मुहूर्त सापडला असून पहिल्या बैठकी मध्ये पुणे येथील मुद्रांक नोंदणी महानिरीक्षकांकडून टीडीआर दराची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भातील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक २९५/१ मधील आरक्षण क्रमांक २२० व २२१ या आरक्षित जागेचा टीडीआर देताना जागा बदल दर्शविण्यात आला होता. सिन्नर फाटा येथे जागा असताना मोक्याच्या बिटको चौकातील जागा दर्शविण्यात आली होती. सिन्नर फाटा येथील जागेचा दर रेडीरेकनर नुसार ६,९०० रुपये प्रतिचौरस मीटर तर बिटको चौकातील दर २५,१०० प्रति चौरस मीटर असताना अधिक किमतीचा टीडीआर देण्यात आला. यातून महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा भुर्दंड बसल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच सन २००९ ते २०१२ या कालावधी मध्ये राष्ट्रीय महामार्गासाठी भुसंपादनाचे अकरा प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातील आठ प्रस्ताव रेल्वेसाठी भुसंपादनाचे होते. रेल्वेसाठी भुसंपादन करायचे असल्याने रेल्वे प्रशासनानेंच मोबदला देणे बंधनकारक असताना तो मोबदला महापलिकेने अदा केल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला. यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर शासनाने चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार आयुक्त कैलास जाधव यांनी चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अंकुश सोनकांबळे, मुख्य लेखा परिक्षक बोधीकिरण सोनकांबळे, मुख्य वित्त व लेखाधिकारी नरेंद्र महाजन, अधिक्षक अभियंता संदीप नलावडे यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश केला.  

स्थळपाहणीसह दर मागविणार 

समितीने सोमवारी सिन्नर फाटा येथील आरक्षित जागेची पाहणी केली. त्यानंतर बुधवारी (ता. २१) बैठक घेतली. यापुर्वीच्या समितीने केलेल्या अहवालाची फाईल तपासली. सन १९९३ व २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्यात नमुद करण्यात आलेल्या आरक्षणांची पडताळणी करण्यात आली. देवळाली शिवारतील सर्वे क्रमांक २९५ च्या आरक्षणासंदर्भात जागा मालकांना देण्यात आलेल्या टिडीआरच्या दराची तपासणी करण्यासाठी मुद्रांक महानिरीक्षकांशी पत्रव्यवहार करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT