murder sakal
नाशिक

Nashik Crime News: परफेक्ट बनाव रचला पण अडकलाच; पत्नीच्या हत्त्येप्रकरणी शिक्षक पतीला मरेपर्यंत जन्मठेप

नरेश हाळणोर

नाशिक : खुनाची रहस्यमय पुस्तके वाचून शिक्षक (Teacher) पतीने चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा गळा चिरून आणि मनगटावर वार करून निर्घृण खून केला.

याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शिक्षक पतीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. (Teacher husband sentenced to life imprisonment for wife murder nashik news)

पत्नीचा खुन केल्यानंतर आरोपी पतीने पोलिसांना स्वत:च खबर देत पत्नीचा कोणीतरी खुन केल्याचा बनाव केला होता. सदरील घटना जून २०१७ मध्ये घडली होती. विलास शंकर मोकळ (रा. रो हाऊस, हेरंब कॉलनी, सिन्नर) असे आरोपीचे नाव आहे. संगीता विलास मोकळ असे मयत पत्नीचे नाव आहे.

आरोपी मोकळ हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. मोकळ हा आई, पत्नी व दोन मुलांसमवेत राहत होता. १९ जून २०१७ रोजी सायंकाळी मुले घराबाहेर खेळायला तर आईही घराबाहेर गेल्याची संधी साधून, आरोपी मोकळ याने पत्नी संगिता हिचा बेडरुममध्ये ब्लेडने गळा चिरला, तसेच तिच्या हाताच्या मनगटाच्या नसा कापल्या.

त्यासाठी त्याने तीन ब्लेड वापरले होते. त्यानंतर तोही घराबाहेर निघून गेला. जरावेळा परत आला असता, त्याने हंबरडा फोडला आणि पत्नीचा खुन झाल्याचा बनाव रचला. स्वत:च त्याने सिन्नर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

याप्रकरणी सिन्नर पोलिसात मयत संगीता मोकळ यांचा भाऊ जनार्दन खंडीझोड यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास सिन्नर पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक सय्यद यांनी कसून तपास केला आणि आरोपी मोकळ यास अटक केली. याप्रकरणी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

सदरील खटला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. मृदुला भाटिया यांच्यासमोर चालला. यावेळी सरकार पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे यांनी १५ साक्षीदार तपासले.

यात वैद्यकीय अधिकारी, फॉरेन्सिकचा अहवाल महत्त्वाचा ठरला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्या. श्रीमती भाटिया यांनी आरोपी मोकळ यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

नियोजनबद्ध रचला होता बनाव

आरोपी मोकळ याने पत्नीचा खुन करण्यापूर्वी खुनासंदर्भातील रहस्यमय पुस्तके वाचल्याचे तपासातून समोर आलेले आहे. आरोपी मोकळ याने पत्नी संगीताचा खुन केल्यानंतर गव्हाचे पोते आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला. सिन्नरमधील एका बारमध्ये गेला आणि मुद्दामपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोरच बीअर पित बसला.

यावेळी तो सातत्याने सीसीटीव्हीकडे पाहत होता. यावरूनच पोलिसांचा संशय बळावला. तसेच त्याने वापरलेले ब्लेडही पोलिसांना मिळाले. आरोपी मोकळ याने अत्यंत नियोजनबद्धरित्या खुनाचा बनाव रचला परंतु पोलिसांच्या तपासात तो अडकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : नगरपरिषद निवडणूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

SCROLL FOR NEXT