teacher innovation award.jpg
teacher innovation award.jpg 
नाशिक

शिक्षकांसाठी 'टीचर इनोव्हेशन ऍवॉर्ड'?...वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (कनाशी) स्टेट इनोव्हेशन ऍन्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र (सर फाउंडेशन) तर्फे शिक्षकांसाठी "टीचर इनोव्हेशन ऍवॉर्ड' या पुरस्कारासाठी राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धा होणार आहे. सर फाउंडेशन गेल्या 14 वर्षांपासून "इनोव्हेशन' या विषयावर कार्य करीत आहे. आय. आय. एम. अहमदाबाद व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार "एज्युकेशन इनोव्हेशन बॅंक' या प्रकल्पांतर्गत या संस्थेने हे कार्य केले आहे. 

इतर राज्यांतील शिक्षकदेखील होणार सहभागी

राज्यातील पूर्वप्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, पर्यवेक्षीय अधिकारी, शिक्षण क्षेत्रात मुक्त काम करणाऱ्या व्यक्ती यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. शिक्षकांनी आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनविताना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तयार करावा. इतर राज्यांतील शिक्षकदेखील यात सहभागी होऊ शकतात. नवोपक्रम हा शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा. नवोपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2020 आहे. राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे, राजकिरण चव्हाण, सतीश सातपुते, संदीप गुंड, नवनाथ शिंदे, मधुकर घायदार, अनघा जहागीरदार यांनी केले आहे. 

संकेतस्थळावर ऑनलाइन पाठवा
 
नवोपक्रम अहवाल लेखनात नवोपक्रमाचे शीर्षक, नवोपक्रमाची गरज व महत्त्व, नियोजन, प्रत्यक्ष कार्यवाही, निष्कर्ष/फायदे, परिशिष्टे, नवोपक्रमाची सद्यःस्थिती या मुद्द्यांचा समावेश असावा. शब्दमर्यादा एक हजार शब्द असून, जास्तीत जास्त तीन फोटोंचा वापर करावा. अहवाल दहा एमबीपर्यंत पीडीएफ स्वरुपात तयार करून http://www.sirfoundation.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पाठवायचा आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT