checkpost
checkpost Nashik
नाशिक

चेकपोस्टवर शिक्षकांची केली नेमणूक; पोलिसांचाही वाढला बंदोबस्त

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि.नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावरील घाटनदेवी परीसराच्या सरहद्दीवर गुरुजनांनी सेल्फी घेत धरला रस्ता या माथाळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त प्रसिध्द करताच स्थानिक प्रशासन खरबडून जागे झाले. बुधवारी (ता.५) चेकपोस्टवर (check post in Igatpuri) सहा शिक्षकांची नेमणूक झाल्याने वाहन तपासणीला पोलिस (Police) यंत्रणेलाही हातभार लागला. पोलिस बंदोबस्तही वाढल्याने मोठ्या प्रमाणात ई-पास (e-pass) नसलेल्या खासगी वाहनधारक प्रवाशांना पुन्हा माघारी जावे लागल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. (Teachers have been deployed at the check post in Igatpuri and police security has also been beefed up)

सोमवारी (ता.३) सकाळमध्ये आरोग्य तपासणीची बोंब वृत्त प्रसिध्द होताच नेमणूक केलेल्या काही शिक्षकांनी चेकपोष्ट येथे जाऊन सेल्फी काढत आपण कसे काम बजावत आहे, असे वृत्त प्रसिध्द झाले होते. चेकपोस्ट उभारल्यापासून आरोग्य विभागाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी येथे आलेच नसल्याने तपासणी अजुनही रामभरोशावरच आहे. त्यामुळे जिल्हयात मोठया प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे २४ तास पोलिसांचे पथक कार्यरत आहे. तीन शीफ्टमध्ये असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी खास मंडपही बांधण्यात आला आहे. पोलिसांना पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करुनच नाशिक जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. पोलिस निरीक्षक समाधान नागरे स्वत: तळ ठोकून आहेत. मुंबईहुन नाशिकला जाणारे व नाशिकहुन मुंबईला जाणाऱ्या खाजगी वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्यासोबत उपनिरीक्षक एस. बी. नवले, राज चौधरी, मुकेश महिरे, सचिन देसले, राहुल साळवे, के. डी. फासले यांच्यासह होमगार्डचे अजय धांडे, विजय धांडे, जखिरे, ठवळे व पथक कार्यरत आहेत.



तालुक्यात सर्वच ठिकाणी लसीकरणाच्या मोहीम सुरु आहे. शिवाय कोविड सेंटरमध्ये मोठया प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असत्याने डॉक्टर व आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे स्टाफ कमी पडत आहे. तसेच ज्या प्रवाशांना ई- पास दिला जातो, त्याचवेळी त्यांची तपासणी केली जाते.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT