Caught a truck carrying cattle for slaughter in nashik district esakal
नाशिक

Nashik Crime News : कत्तलीसाठी जनावरे नेणारा टेंपो गोरक्षकांनी पकडला; 5 गोवंश जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात कत्तलीसाठी विनापरवाना गोवंश आणणारा पिकअप टेम्पो मुंबई-आग्रा महामार्गावरील मारुती सुझुकी शोरुमसमोर गोरक्षकांनी संशयावरुन पकडला. तरुणांनी तपासणी केली असता टेम्पोमध्ये पाच गोवंश आढळून आले.

पोलिसांनी टेम्पो (एमएच ः ४१, जी ः ३०१६) व पाच गोवंश जप्त केले. (tempo carrying animals for slaughter was caught nashik news)

दरम्यान या प्रकारानंतर संतप्त झालेल्या काही तरुणांनी पिकअप चालकास मारहाण केल्याने हा वाद वाढला.

कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांच्यासह पूर्व भागातील विविध पक्ष संघटनांनी मारहाण प्रकरणी निषेध केला. अपर अधीक्षक व संबंधितांची भेट घेऊन मारहाण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी सुलतान शेख अय्युब (२८, रा. देवीचा मळा) व सज्जाद मोहम्मद सलीम (१९, रा. आयशानगर कब्रस्तान) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याउलट सुलतान शेख अय्युब याच्या तक्रारीवरुन टेम्पोतून पाच गोवंश जातीचे जनावरे घेऊन जात असताना चार अनोळखींनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांनी आपल्याला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. पिकअपच्या काचा फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT