Rain formed ponds on the road leading to the Revenue Commissioner's office esakal
नाशिक

नाशिकरोडला जागोजागी पुन्हा तळे; रस्त्यावरची तात्पुरती मलमपट्टी उखडली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : परिसरात पावसामुळे रस्त्यांवर डांबराची केलेले मलमपट्टी पुन्हा उखडली आहे. ठिकठिकाणी पुन्हा रस्त्यावर खड्डे पडलेले असून, तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तात्पुरती केलेली रस्त्यावरची मलमपट्टी पुन्हा जशास तसे झाल्यामुळे येथील मुख्य रस्त्यावरचे खड्डे सध्या अपघातांचे केंद्र ठरत आहे.

जयभवानी रोड, दत्तमंदिर रोड, विहीतगाव, बिटको चौकातील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यातच पावसामुळे खड्डे व रस्ते अधिक धोकादायक झाले आहेत. गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे कायम असतानाच नव्या खोदकामामुळे समस्येत भर पडली आहे.

उपनगर नाका ते जयभवानी रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता गॅस पाईपलाईनसाठी अनेक दिवसांपासून खोदून ठेवलेला आहे. बिटको चौक ते विहीतगाव पूल दरम्यानचे खड्डे अनेक महिन्यांपासून कायम आहेत. विहीतगाव सिग्नल ते वडनेर रोड, जेलरोड पाण्याच्या टाकीच्या आसपासचा परिसर, कॅनॉल रोड झोपडपट्टी, दत्तमंदिर, रोकडोबावाडी विहीतगाव, सिन्नर फाटा, नाशिक- पुणे रोडवरील सिन्नर फाटा येथील खड्डे, नांदूर नाका, पंचक येथील चौकात पडलेले खड्डे सध्या अपघाताचे कारण ठरत आहे.

रोज लहान- मोठे अपघात होत असून, रस्त्यांवर केलेली तात्पुरती मलमपट्टी धोकादायक ठरत आहे. पावसामुळे ही मलमपट्टी पुन्हा जैसे थे झाली आहे. पावसानंतर माती बाहेर पडून चौक धोकादायक झाला आहे. दत्तमंदिर चौक ते आनंदनगर रस्त्यावरही खड्डे झाले आहेत.

या रस्त्यावरील स्वामी समर्थ मंदिरासमोरील खड्ड्यात वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. नाशिक-पुणे मार्गावरील उपनगर नाक्यावरील साईबाबा मंदिराजवळ तसेच जुन्या बसथांब्याजवळ खड्डे आहेत. नारायणबापू चौक ते टाकळी- समतानगर दरम्यानही रस्त्यावर खड्डे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: अंबादास दानवेंनंतर कोण? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी 'हे' नाव फायनल?

Cyclist Died during Tour: दुर्दैवी! शर्यतीदरम्यानच १९ वर्षांच्या सायकलपटूचा अपघातात मृत्यू; नेमकं काय झालं, जाणून घ्या

Nagpur Crime : पत्नीस पोटगी देण्यासाठी झाला सोनसाखळी चोर

Virar News : उत्तर भारतीयांची मते कोणाला? यावर वसई विरारमध्ये घडताहेत चर्चा

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

SCROLL FOR NEXT