malegaon.png 
नाशिक

पोलिसांची नजर चुकवून मुंबईचे 'ते' दहाजण सिन्नरला पोहचले तर खरे...पण

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिन्नर) येथील सिन्नर- घोटी रोडवरील बेलू फाट्यावर शनिवारी (ता.11) दुपारी पावणेदोनच्या सुमारास मुंबईहून दोन वाहनांतून उत्तर प्रदेशातील अलाहाबादकडे जाणाऱ्या दहा जणांना सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना येथील पालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना नांदूरशिंगोटे येथील निवारागृहात ठेवले आहे. 

त्या दहाजणांचा संचारबंदी असतांनाही प्रवास

मुंबईहून दोन टॅक्‍सीने दहा जण सिन्नरच्या दिशेने निघाल्याची खबर सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी गस्तीवरील सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी, हवालदार उदय पाठक, नितीन कटारे, नवनाथ शिरोळे, श्रीकांत गारुंगे यांना कळविले. सिन्नर- घोटी रस्त्यावरील बेलू फाट्यावर टॅक्‍सी (एमएच 02-डीक्‍यू-0855) व दुसरी टॅक्‍सी (एमएच 01-बीटी-2941) यातील दहा जण संचारबंदी असतानाही प्रवास करताना आढळले. यात महमद तलहा मुजीबुल्ला (वय 22, रा. मजगव्हा), रमजान आजम अली (38), वारीस अली जहुर अली (52, दोघे रा. इतईपूर, प्रतापगड, उत्तर प्रदेश), बाशिद अहमद फरीद अहमद (52, वरसंगा, पोस्ट छितपालगड, प्रतापगड), समीर निजामुद्दीन अहमद (42, कलिना, शास्त्रीनगर, सांताक्रुज, मुंबई), महमद हनिफ अब्दुल माजीद खान (62, संगमनगर झोपडपट्टी, वडाळा, मुंबई पूर्व), सादउल्ला अब्दुल जलिल खान (29), जाहीरुद्दीन अब्दुल मजीदखान (56, अकबर काला कंपाउंड, वसई), मोहमद अली खान सलाम अली खान (50) महमद जाफर खान मोमान अत्तार खान (रा. छोटी पैंगरी चाळ, एस. पी. रोड, सम हॉटेलजवळ, मुंबई) यांना सिन्नर पोलिसांनी टॅक्‍सीसह ताब्यात घेतले.

त्यांच्यावर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संसर्ग पसरण्याची जाणीव असताना हयगयीचे कृत्य करून मास्क न लावता मुंबई ते अलाहाबाद (उत्तर प्रदेश) असा प्रवास करताना आढळल्याने गुन्हा दाखल करत त्यांना सिन्नर पालिकेच्या दवाखान्यात नेऊन प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर त्यांना नांदूरशिंगोटे येथील निवारा शेडमध्ये हलविल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT