newborn-baby_.jpg 
नाशिक

आश्चर्यच! लग्नानंतर दहा वर्षांनी दाम्पत्याला लागली लॉटरी...एक सोडून तिघांची एंन्ट्री!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (जेलरोड) परिसरातील नवजीवन हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये मागील आठवड्यात तिळे जन्माला आलेत. जन्मलेल्या तिन्ही कन्या रत्नांचे कुटुंबियांनी आनंदात स्वागत केले. लग्न झाल्यानंतर दहा वर्षांनी सदर महिलेला संतती प्राप्त झाली.

लॉकडाउनमध्ये तिघींचे वेलकम

जेलरोड परिसरातील सर्वसामान्यांच्या उपचारासाठी प्रसिद्ध असलेले नवजीवन हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये तिळे जन्माला आल्याने कुटुंबीयांसोबतच हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. नितीन आरसुळे व हॉस्पिटलच्या स्टाफचा आनंद गगनात मावत नव्हता. शारीरिक प्रतिकूल परिस्थिती व जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अशा परिस्थितीत आठव्या महिन्यातच सदर महिलेची प्रसूती करावी लागणार असल्याने सर्वांच्याच चिंता वाढली होती. मात्र डॉ. नितीन आरसुळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर स्त्रीला योग्य समुपदेशन करून तिच्यासह तिच्या कुटुंबियांचे मानसिक मनोबल वाढवले. सदर महिलेवर योग्य उपचार करून यशस्वीपणे बाळंतपण करण्यात आल्याने प्रसूत माता व तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले व जन्मलेल्या तिन्ही मुलींचे आनंदाने स्वागत केले. डॉ. आरसुळे यांना डॉ. सचिन पाटील व नवजीवन हॉस्पिटल व मॅटर्निटी होमच्या सेवकांचे उत्तम सहकार्य लाभले.

आई होणे यापेक्षा मोठे सुख जगात दुसरे काही असू शकत नाही. योग्य औषधोपचार, व्यायाम, आहार, गरोदरपणातील दिनचर्या, समुपदेशन यामुळे भयमुक्त व तणावमुक्त प्रसूती होण्यास मदत होते. - डॉ.नितीन आरसुळे, स्त्रीरोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT