ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik ZP News: प्लास्टिक विघटन यंत्र खरेदीची निविदा रद्द; वित्त आयोगाचा निधी वापरण्याचा निर्णय अंगलट

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने २.४० कोटींच्या प्लास्टिक विघटन यंत्र खरेदीची निविदा मंजुरीसाठीचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी रद्द करत नव्याने निविदा राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेली खरेदी फेरनिविदेतून मार्गी लागण्याची शक्यता आहे. शासकीय नियम डावलून वित्त आयोगाचा निधीही वापरण्याचा संबंधित विभागप्रमुख वर्षा फडोळ यांचा प्रयत्न अंगलट आला आहे. (Tender for purchase of plastic disintegrating machine cancelled Finance Commission decision to utilize funds upheld Nashik ZP News)

स्वच्छ भारत मिशन टप्पा दोनमधून स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाला २.४० कोटी रुपये निधी दिला आहे. प्रत्येक पंचायत समितीसाठी १६ लाख रुपये निधीतून प्रत्येकी एक प्लास्टिक विघटन केंद्र उभारण्यात येणार आहे.

यासाठी स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने निविदा प्रक्रिया राबवली. त्यात खरेदी समितीची बैठक न घेणे, इतर जिल्हा परिषदांनी केलेल्या खरेदीचे दर पडताळणी न करणे, प्रिबीड बैठक न घेणे आदी बाबींमध्ये अनियमितता झाल्याचे तसेच उद्योग व ऊर्जा विभागाच्या १ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयाचे पालन न झाल्याचा अभिप्राय नोंदविला होता.

राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी १६ लाख रुपये निधीतून प्लास्टिक विघटन यंत्र खरेदी करून हे यंत्र चालवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला केवळ जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद असताना नाशिक जिल्हा परिषदेने त्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्याचा निर्णय घेऊन त्याचीही निविदा प्रक्रिया राबवली.

त्यामुळे ही निविदा वादात सापडली. लेखा व वित्त विभागाने फेरनिविदा राबविण्याचा अभिप्राय नोंदविलेला असताना संबंधित विभागप्रमुख डॉ. वर्षा फडोळ यांनी निविदा योग्य असल्याचे सांगत ती कायम ठेवण्याचा आग्रह धरला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मित्तल यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारींवर या वादग्रस्त निविदा प्रकरणी तोडगा काढण्याची जबाबदारी सोपवली. मात्र, या निविदांच्या फायलीतील एकूण अनियमितता बघता, त्यांनी काहीही निर्णय दिला नाही.

त्यानंतरही सादर केलेले दर कसे योग्य आहेत, याची मांडणी करून त्या दरांना मान्यता देण्याचा प्रस्ताव पुन्हा सादर केला. दरम्यानच्या काळात या निविदेसाठी असलेली ९० दिवसांची मुदत ७ मे २०२३ ला संपुष्टात आली.

यामुळे लेखा व वित्त विभाागाने निविदा वैधता मुदत संपल्याच्या कारणााने फेरनिविदा करण्याची शिफारस केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी प्लॅस्टिक विघटन यंत्र खरेदीचे निविदा रद्द करून ते फेरनिविदा राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेतही या निर्णयावर सोमवारी (ता.१५) शिक्कामोर्तब करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Nashik Shalarth Scam: शालार्थ घोटाळ्याची ‘कागदपत्रे’ पोलिसांच्या रडारवर; ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची शहानिशा

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT