terrible bike tractor accident at dasvel phata marathi news 
नाशिक

भीषण अपघात...खड्डे चुकवताना ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक जागीच ठार

अरुण भामरे

नाशिक/अंतापुर : दसवेल (ता. बागलाण) जवळील राजापूर फाट्याजवळ खड्डे चुकवताना दुचाकी व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन देश शिरवाडे (ता.साक्री, जि.धुळे) येथील नरेंद्र शिवराम हिरे (वय ४०) जागीच ठार झाले. तर सोबत असलेला मित्र दिनेश श्रावण पवार (रा. लोहणेर, ता.देवळा) यास गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून चालक फरार झाल्याची माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली. 

खड्डे चुकवताना दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात

विंचूर- प्रकाशा राजमार्ग अंतर्गत राजापूर फाटावरून खडीने भरलेला ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच. ४१ ए.ए. ०६१०) व लोहनेर येथे मेव्हण्याकडे सलून व्यवसाय करणारे मृत नरेंद्र हे मित्र दिनेश यास घेऊन दुचाकी (क्रमांक एम. एच. ४१. ए. जे. ३२४०) हा देशशिरवाडे येथे आपल्या गावी जात होता. परंतु खड्डे चुकवताना दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन नरेंद्र हे जागीच मृत झाले. दसवेल येथील पोलीस पाटील रवींद्र निकम यांनी पोलीस स्टेशनला कळविले असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद सोनवणे, पोलीस नाईक टी. एस. जगताप, निंबा खैरनार, शिपाई देवा माळी यांनी प्रत्यक्ष जागेवर पंचनामा केला. नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृताच्या मूळगावी अंत्यसंस्कार झाले. नरेंद्र यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

कोरोना, पाऊस अन डांबराचे कंपनीकडून कारण 

पिंपळनेर ते सटाणा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. यासंदर्भात पिंपळकोठे सोसायटीचे सभापती पंकज भामरे यांनी महाराष्ट्र विकास मंडळ अंतर्गत सदर रस्त्याचे काम घेतलेली कंपनी आशिष इन्फ्राकॉनचे व्यवस्थापक वासुदेव गोहाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित दुरुस्त करून काम करताना अपघात होणार नाही याबाबत काळजी घेण्यास सांगितले. परंतु व्यवस्थापक यांनी कोरोना व पावसाचे नाव सांगून काम करण्यास अडचणी येत असून डांबर मिळत नसल्याचे सांगितले. 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT