While discussing the election of Nashik Bazar Committee, Deputy Leaders of Thackeray group Baban Gholap, Datta Gaikwad, Vijay Karanjkar, Sudhakar Badgujar, Vasant Gite etc. esakal
नाशिक

Market Committee Election : बाजार समितीच्या 18 जागा ठाकरे सेना ताकदीने लढविणार!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व 18 जागांवर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील चुरस अधिक वाढली असून दोन्ही आजी- माजी खासदारांना आव्हान निर्माण होणार आहे. (Thackeray Sena will fight for 18 seats market Market Committee Election nashik news)

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कोर समितीची बैठक उपनेते बबन घोलप यांच्या निवासस्थानी पार पडली. त्या वेळी संपूर्ण ताकदीनिशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. सोसायटी गटात ११, ग्रामपंचायत गटात चार, हमाल- मापारी एक तर व्यापारी गटात दोन अशा एकूण १८ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

निवडणुकीसाठी ग्रामपंचायत गटासाठी २०७० तर सोसायटी गटासाठी एक जार ५९७ असे एकूण तीन हजार ६६७ मतदार आहेत. शिवसेनेकडे पॅनल करण्याइतके सक्षम उमेदवार आहेत. अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छाही दर्शविली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात येणार असून, नंतर त्यांची छाननी केली जाईल. मित्र पक्षाशी आघाडी करायची किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे उपनेते घोलप यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने गेल्यावेळी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी सहा उमेदवार निवडून आले होते. मात्र, या वेळी पक्षाला पोषक वातावरण असल्याने त्याचा पुरेपूर लाभ आम्ही उठवू, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड म्हणाले. बैठकीस जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने भारताची चिंता वाढली! सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी शर्यत; पाहा समीकरण

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध सामना कुठे फिरला, ज्यामुळे भारताचा झाला ४ धावांनी पराभव, हरमनप्रीत कौरने बोलून दाखवली मनातलं दु:ख

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT