Thakkar Dome Covid Center will be started in Nashik Corona Updates 
नाशिक

नाशिकमध्ये ठक्कर डोम कोविड सेंटर सुरू होणार; महापौरांसह आमदार ढिकलेंकडून पाहणी

विक्रांत मते

नाशिक : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रस्तावित ठक्कर डोम कोविड सेंटरची पाहणी केली. तीनशे खाटांचे कोविड सेंटरचे काम वेगाने सुरू असून, येत्या तीन ते चार दिवसांत कोरोनाबाधितांवर उपचार शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, सद्यःस्थितीत अडीच ते तीन हजार रुग्ण दररोज बाधित होत आहेत. महापालिका व खासगी हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या अपुरी पडत असून, नागरिकांचे बेड उपलब्धतेबाबत सातत्याने दूरध्वनी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठक्कर डोम कोविड सेंटरची पाहणी करण्यात आली. आमदार अॅड. राहुल ढिकले, महापालिकेचे सभागृहनेते सतीश सोनवणे या वेळी उपस्थित होते.

महापालिकेने नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याण व पंचवटी भागातील मेरी येथील पंजाबराव देशमुख वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. सद्यःस्थितीत डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १५ व नवीन बिटको हॉस्पिटल येथे २१, असे एकूण ३६ व्हेंटिलेटर बेड कार्यान्वित असून, डॉ. झाकिर हुसेन येथे ९४ ऑक्सिजन बेड व नवीन बिटको हॉस्पिटल येथे २०५ ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहे. सध्या ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने नवीन बिटको हॉस्पिटल येथे नव्याने २०० ऑक्सिजन बेड रुग्णांना उपलब्ध करून देण्याबाबत तातडीची कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी ६० ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले आहे. उर्वरित बेडचे कामही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली. 
 

महापालिका प्रशासन व पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील राहून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे व शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. 
-सतीश कुलकर्णी, महापौर, महापालिका 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Crime: पारधमध्ये ‘लव्ह जिहाद’! दहा वर्षांपासून पीडितेवर अत्याचार, जालन्यातून दोन संशयित अटकेत!

Ganga Godavari Maha Aarti : नाशिकमध्ये आज गंगा-गोदावरी महाआरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा, वाहतुकीत मोठे बदल

Latest Marathi News Live Update : कासा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार,रोहित पवारांनी घेतली पीडितेच्या कुटुंबाची भेट

Pavitra Portal News: ‘पवित्र’ पोर्टलचा गोंधळ! निवड होऊनही ८०% शिक्षक रुजू नाहीत, विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर!

Palghar Road Construction Delay : गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग संकटात! कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT