CET Esakal
नाशिक

कनिष्ठ महाविद्यालय स्‍तरावर अकरावीची प्रक्रिया राबवू नका!

अरूण मलाणी

राज्‍यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही.

नाशिक : राज्‍यभरात कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे दहावीची लेखी परीक्षा (Written examination of class SSC) होऊ शकलेली नाही. अशात काही माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांकडून त्‍यांच्‍या स्‍तरावर प्रवेशासाठी अर्ज मागविले जात आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाने आदेश जारी करत ही प्रक्रिया तत्‍काळ थांबविण्यास सांगितले आहे. विद्यार्थी व पालकांचे दिशाभूल न करण्याचे निर्देश दिलेले आहेत. (The director of education has instructed not to implement the eleventh process at the junior college level)

शिक्षण विभागातर्फे जारी केलेल्‍या आदेशात म्‍हटले आहे, की ब्रृह‍मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह नाशिक, नागपूर, औरंगाबाद व अमरावती महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पद्धतीने होतात. राज्‍याच्‍या उर्वरीत क्षेत्रात स्‍थानिक पातळीवरुन प्रवेश दिले जातात. दरवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया साधरणतः दहावीच्‍या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर सुरु होते. राज्‍यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही.

तथापि काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी २०२१-२२ साठी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असल्‍याचे निदर्शनात येते. त्‍यासाठी गुगल फॉर्मसारख्या सोशल मीडियाचा वापर करत अर्ज मागविणे सुरु केले आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. तर राज्‍यातील २०२१-२२ मधील अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्‍तर दिशानिर्देश शासन आदेश प्राप्त झाल्‍यानंतर कळविण्यात येतील. तत्‍पूर्वी कोणत्‍याही कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया आपले स्‍तरावर सुरु करू नये. विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल, अशा प्रकारच्‍या सूचना दिल्‍या जाऊ नये शिक्षण संचालक द. गो. जगदाप यांनी आदेशत स्‍पष्ट केले आहे. (The director of education has instructed not to implement the eleventh process at the junior college level)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! T20 World Cup साठी संघात निवड झालेल्या खेळाडू ICC कडून निलंबित; मॅच फिक्सिंगचे आरोप

Accident News: स्लीपर बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात! ४ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये माय-लेकराचा समावेश; काही प्रवाशी जखमी

Horoscope: लवकरच होतोय शुक्र उदय! 4 राशींना मिळेल अमाप पैसा; अनपेक्षित गुड न्यूज, कामामध्ये मोठं यश, दिवाळीपर्यंत चमकत राहील भाग्य

Pune Water Supply: पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद; 'या' भागातल्या जलवाहिनीचं काम सुरु

Malegaon News : मालेगावच्या प्रगतीचा 'पॉवरफुल' आधारवड कोसळला; यंत्रमाग, शेती अन् सिंचनासाठी दादांनी उघडली होती तिजोरी

SCROLL FOR NEXT