Digital Gram Panchayat esakal
नाशिक

पुरातन वृक्षांची डिजिटल नोंद घेणारी राज्यातली पहिली ग्रामपंचायत

पुरातन वृक्षांची माहिती गुगल वर टाकणारी हि राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

विक्रांत मते

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने पर्यावरण पूरक अनेक योजना व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्यानंतर यंदाही अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत हद्दीतील पुरातन वृक्ष (हेरिटेज ट्रीज) गणना पुर्ण करून वृक्षांची नोंद गुगल मॅप्स वर टाकण्यात आली आहे. पुरातन वृक्षांची माहिती गुगल वर टाकणारी पिंपळगाव बसवंत हि राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत असून ग्राम पंचायतीच्या वतीने नुकतेच पुरातन वृक्षांची गणना पुर्ण करण्यात आली आहे. गावाच्या एकुण क्षेत्रफळात सोळा हजार ५०० वृक्षांचा समावेश आहे. त्यातील ४८० वृक्षांना हेरीटेज दर्जा आहे. एकुण हेरीटेज वृक्षांमध्ये २२० वर्षांपूर्वीचे एक जुने वडाचे झाड आहे. उर्वरित वृक्षांचे आयुर्मान शंभर ते दिडशे वर्षांचे आहे. ग्रामपंचायतीने हेरिटेज वृक्ष गणना पूर्ण करून गुगल मॅप्स वर प्रकाशित केली आहे. डिजिटल पद्धतीने वृक्षांचे छायाचित्रासह नाव आणि माहिती गुगल मॅप्स वर प्रकाशित करणारी पिंपळगाव बसवंत राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या फेसबुक पेजवर हेरिटेज वृक्षांच्या नोंदीची दखल घेण्यात आली असून पर्यावरण विभागाच्या सचिव डॉ. मनीषा म्हैसेकर यांनी याबद्दल फेसबुकवर सरपंच अलका बनकर व सचिव लिंगराज जंगम यांचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; भारताची पदकतालिकेत आगेकूच

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT