पारंपारिक वस्तूंची आजही मागणी esakal
नाशिक

विवाह समारंभात पारंपारिक वस्तूंचे महत्त्व आजही टिकून

प्रमोद सावंत

नरकोळ (जि. नाशिक) : विवाह समारंभात आमूलाग्र बदल होत असले तरी पारंपरिक वस्तूंचे महत्त्व आजही कायम आहे. यात मातीचे खापर, चूल, केरसुणी, टोपली, सूप, बेळमाथणी या वस्तूंचे पूजन विवाह समारंभात केले जाते. या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

मातीच्या खापरीला विशेष महत्त्व

विवाह समारंभाचा पहिला दिवस हा घरापुढे मांडव टाकल्यानंतर पूजाविधी करण्याची लगबग सुरू होते. यात नव्या मातीच्या खापरीला विशेष महत्त्व आहे. या खापरीवर व चुलीवर पुरणाच्या पोळ्या करून नैवेद्य ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे मांडवाच्या ठिकाणी बेळीला बेळमाथणी ठेवण्यात येऊन विधिवत पूजा होते. आजच्या आधुनिक युगात नक्षीदार बेळमाथणीला महत्त्व आहे. यात टोपली, सूप यांचाही समावेश असतो. लग्नघरात नवीन देव आणण्यासाठी नव्या सुपाचा उपयोग होतो. पूर्वी लग्नघरून खापर व बेळमाथणी आणण्यासाठी कुंभाराच्या घरी वाजतगाजत जाऊन खापर आणत. आता धावपळीच्या युगात ही प्रथा मागे पडली.

मातीच्या खापरी अशा आहेत उपयोगी...

मातीमध्ये अनेक जीवनसत्त्व आणि पोषक द्रव्य मिळतात. या उद्देशाने पुरणपोळी बनवितात. मातीच्या चुलीवरची पुरणपोळी व भाकरीही चविष्ट असतात.

अशा आहेत लग्नसमारंभास लागणारे वस्तू व दर :

खापर लहान - २०० रुपये

खापर मोठी - ३५० ते ४००

मातीचे चूल - १००

सिमेंट चूल - २००

डिझाईइन बेळमाथण - १५०

बेळ माथण - २००

टोपली - ४०

सूप -१६० ते १८०

केरसुणी - ६० ते ७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune City : पुणे शहर विद्रूपीकरण करण्यात भाजपचेच नेते अव्वल! दोन नेत्यांनी पटकावला नंबर, पाहा संपूर्ण यादी!

Adani Group Melghat Project : अदानी समूहाच्या अडचणीत वाढ; मेळघाटातील जलविद्युत प्रकल्पावरून कायदेशीर नोटीस; १६ मुद्द्यांवर माहिती सार्वजनिक करण्याची मागणी

आज महाराष्ट्राच्या मनावर करतेय राज पण कॉलेजमध्ये कुणीही देत नव्हतं भाव; आता म्हणते- आता त्यांना पश्चाताप होत असेल की..

Latest Marathi News Live Update : पालघरच्या विक्रमगड येथे बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, सात जणांना अटक

स्वयंपाकघरात मीठ ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? दिशा, डबा अन् झाकणाबाबत जाणून घ्या वास्तुनियम

SCROLL FOR NEXT