onion.jpg 
नाशिक

शेतकऱ्यांनो कांदा सांभाळा...! चोरांची नजर आता कांद्यावर देखील; वाचा काय घडले?

प्रशांत बैरागी

नाशिक : (नामपूर) कांद्याचे भाव दिवसागणिक वाढत असताना कांदा चोरीच्या घटनांनी कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. अशीच घटना नामपूर येथील प्रगतशील शेतकरी तथा शिवछत्रपती सहकारी मंगल कार्यालयाचे माजी संचालक शशिकांत सावंत यांच्या बाबतीत घडली. शेताचे प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी उन्हाळ कांदा, ठिबकच्या नळ्या, पिस्टन नळ्या असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

असा आहे प्रकार

कांदा उत्पादक शेतकरी शशिकांत सावंत यांची साक्री रस्त्यालगत (गट क्र. -१०३) मध्ये सुमारे पाच एकर शेती आहे. मार्च महिन्यात त्यांनी उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले. भविष्यात कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने आपल्या कांदाचाळीत साठवून ठेवला. गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दराने दोन हजार रुपयांचा टप्पा पार केल्याने श्री. सावंत समाधानी होते. त्यांनतर त्यांनी दोन ट्रॉली कांदा विकला. परंतु शुक्रवारी (ता. ११) सकाळी शेतात गेल्यानंतर कांदा व ठिबकसिंचन संच चोरीस गेल्याचे उघडकीस आले. आपल्या शेतातील सुमारे दहा क्विंटल कांदे, पाच एकर क्षेत्रावरील ठिबक सिंचनाच्या नळी, ९०० फूट पिस्टनची नळी असा ऐवज चोरून नेला. कांदा चाळीमध्ये कांदा नसल्याने त्यांना जबर धक्काच बसला. 

परिसरात पाहणी केली असता शेतापासून काही अंतरावरच थोडे फार कांदे पडले होते. त्याठिकाणी गाडीच्या चाकाचे वण दिसून आले. चोरट्यांनी गाडीत कांदा चोरून नेल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. विक्री आधीच चोरट्यांनी शेतातील कांद्यावर डल्ला मारल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. चोऱ्यांमागे स्थानिक चोरट्यांचाच हात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

Pune News : लग्नानंतर वर्षातच न्यायालयात जाणाऱ्याला दणका; न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT