Exhibition of stolen paintings in Jahangir Art Gallery. esakal
नाशिक

Spot Painting स्पर्धेतील चित्रांचा काळाबाजार; विजेती अनेक चित्रे गायब

सोमनाथ कोकरे

नाशिक : वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या विविध प्रकारच्या चोऱ्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो. किंबहुना साहित्य क्षेत्रातील ‘चौर्या’च्याही अनेक सुरसकथा नेहमीच आपल्याला ऐकावयास मिळतात.

मात्र या सर्वांचा कळस म्हणजे स्पॉट पेंटिंग स्पर्धेतील अनेक विजेत्या चित्रांचीच चोरी करून त्यांच्यावर स्वत:चे नाव टाकून थेट मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. (theft paintings from spot painting competition exhibition in jahangir art gallery nashik latest marathi news)

जहांगीर आर्ट गॅलरीत चोरीच्या चित्रांचे प्रदर्शन.

येथील तिळभांडेश्‍वर लेनमध्ये नाशिक कलानिकेतनचे चित्रकला महाविद्यालय आहे. येथे दर वर्षी राज्यस्तरीय प्रत्यक्ष चित्र रेखाटन स्पर्धा (स्पॉट पेंटिंग) होते. या स्पर्धेत सहभागी प्रत्येक चित्रांवर स्पर्धक चित्रकाराचे नाव व त्यांना देण्यात आलेला अनुक्रमांकही असतो. स्पर्धा संपल्यानंतर ही चित्रे सहभागी चित्रकारास न देता ती कलानिकेतनकडे ठेवून घेतली जातात.

मात्र, अशी अनेक वर्षांपासूनची साठलेली चित्रे आता गायब झाली असून, त्याचे थेट मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवले गेल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी काही चित्रकार मुंबईला गेले असताना, ही आपलीच चित्रे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. एवढेच नव्हे, तर काहीं चित्रांमध्ये थोडाफार बदल केल्याचेही त्यांच्या लक्षात आले. संबंधित चित्रकारांनी यावर आक्षेप घेत ही बाब गॅलरी व्यवस्थापनाच्या लक्षात आणून देताच प्रदर्शन बंद करण्यात आले आहे.

जहांगीर आर्ट गॅलरीत चोरीच्या चित्रांचे प्रदर्शन.
जहांगीर आर्ट गॅलरीत चोरीच्या चित्रांचे प्रदर्शन.

अशी झाली चित्रांची चोरी

चित्रकला महाविद्यालयाच्या भिंतीवर चित्र रेखाटण्याचे काम योगेश वालदे यास देण्यात आले होते. त्या वेळी कोरोनाचा कालावधी असल्याने सर्व वर्ग बंद होते. महाविद्यालय बंद असतानाच ही स्पर्धेतील स्पॉट पेंटिंग गायब झाली.

ही विजेती चित्रे रूपेश सोनार, दर्शन गौपुळे, गजानन शेळके, स्वप्नील पाटे, वैभव गायकवाड, अजित राऊत, सुमित ब्राह्मणकर, प्रवीण कारंडे, शुभम तपकिरे यांची असून, स्पर्धेतील विजेत्या चित्रांवर ‘योगेश वालदे’ असे नाव टाकून या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

जहांगीर आर्ट गॅलरीत चोरीच्या चित्रांचे प्रदर्शन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT