public toilet esakal
नाशिक

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागात महिलांची प्रसाधनगृहा अभावी कुचंबना

नाशिक शहराचा मध्यवर्ती भाग सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय या भागात महिलांसाठी साधे प्रसाधनगृहही नाही.

सकाळ वृत्तसेवा

पल्लवी कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंधरा तालुक्याचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात रोज ग्रामीण भागातून महिलांचा राबता असतो. रोज शेकडो महिला उद्योग व्यवसाय व कामानिमित्ताने नाशिकला येतात. मात्र, शहराचा मध्यवर्ती भाग सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय भागात महिलांसाठी साधे प्रसाधनगृहही नाही. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबना होते.

महिलांना मोठ्या प्रमाणात समस्‍या

नाशिकची स्‍मार्टसिटीकडे वाटचाल सुरू आहे. आणि या स्‍मार्ट सिटीतच मध्यवर्ती ठिकाणी अशोक स्‍तंभ ते गंगापूर रोड या दोन किलोमीटर अंतरापर्यंत महिलांसाठी एकही प्रसाधनगृह नाही. स्‍मार्टसिटी म्‍हणून मिरवताना महिलांसाठी साधे प्रसाधनगृहही नाही. महिलांसाठी हा अतिशय गंभीर प्रश्‍न आहे. स्‍मार्ट सिटी म्‍हणजे सुख- सोयींयुक्‍त सिटी असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात मात्र, साधे प्रसाधनगृहही नाही. जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय भागात रोज शेकडो महिला येतात. पण प्रसाधनगृह नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. या ठिकाणी छोटेमोठे व्यवसाय करणाऱ्या महिला, जसे फूल विक्रेत्‍या, फळ विक्रेत्‍या, चहा विक्रेत्‍या, प्रवासी महिला यांच्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर एकही प्रसाधनगृह नाही. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात समस्‍येला सामोरे जावे लागते.

''सकाळी सातपासून दुपारी बारापर्यंत अशोक स्‍तंभ येथे फूल विक्रीचा व्यवसाय करते. महिलांच्या अडचणीची दखल घेतली जावी. प्रसाधनगृह नसल्याने महिलांची मोठी कुंचबणा होते.'' - सुनंदा सोनवणे, फूल विक्रेत्‍या

''जिल्हाधिकारी कार्यालयात महिला रोज येतात. सध्या केवळ सीबीएस स्थानकावर प्रसाधनगृह आहे. त्यानंतर न्यायालयापासून तर अशोक स्तंभ आणि लगत गंगापूर रोड व इतर भागातही नसल्याने रोजच प्रवासी महिला प्रसाधनगृहासाठी चौकशी करतात.'' - नर्मदा आहिरे, चहा विक्रेत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT