dada bhuse 1.jpg 
नाशिक

''खरिपात बियाणे अन्‌ खतांचा तुटवडा जाणवणार नाही''

सकाळवृत्तसेवा

नाशिक : बियाणे बदलाच्या दरानुसार 16 लाख 15 हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. 15 लाख 45 हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. तसेच खरिपासाठी राज्याला 40 लाख टन खतांची आवश्‍यकता असून, 33 लाख 11 हजार टन खते विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. 17 लाख टन खतांची विक्री झाली आहे. सद्यःस्थितीत बियाणे आणि खतांचा तुटवडा जाणवणार नाही, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

कापूस बियाणे पाकिटांचा बांधापर्यंत पुरवठा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना बांधावर खते आणि बियाण्यांचा पुरवठा मोहीम राबविण्यात येत आहे. सहा लाख 12 हजार शेतकऱ्यांना दोन लाख सहा हजार टन खते आणि एक लाख 26 हजार क्विंटल बियाण्यांचा, तर तीन लाख 69 हजार कापूस बियाणे पाकिटांचा बांधापर्यंत पुरवठा करण्यात आला आहे, असे सांगून श्री. भुसे म्हणाले, की लॉकडाउनमध्ये 27 मार्चपासून शहरी भागातील ग्राहकांसाठी शेतमालाची थेट विक्री शेतकऱ्यांकडून करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दिवसाला वीस ते पंचवीस हजार क्विंटल याप्रमाणे तेरा लाख क्विंटल फळे व भाजीपाल्याची विक्री झाली आहे. याशिवाय मध्य प्रदेशातून 24 मेस मोर्शी (जि. अमरावती) येथे टोळीधाडीने प्रवेश केला. 

ऑनलाइन माध्यमाचा वापर

अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत प्रादुर्भाव आढळून आला, तो 3 जूनपर्यंत होता. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा 13 जूनला भंडारा व गोंदिया जिल्ह्यात टोळधाड आली. तिच्या नियंत्रणासाठी बाराशे लिटर कीटकनाशकांची फवारणी ट्रॅक्‍टर यंत्र, अग्निशमन दलाचे बंब आणि ड्रोनद्वारे करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विस्तार कार्यासाठी ऑनलाइन माध्यमाचा वापर करण्यात आला. दहा लाख शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्फे कापूस, सोयाबीन, भात, तूर व इतर कडधान्य आणि फळे-भाजीपाला या विषयाच्या राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आल्या. 

साडेसात लाख हेक्‍टरवर पेरण्या 

राज्यातील एक कोटी 41 लाख 18 हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी साडेसात लाख हेक्‍टरवर खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. या महिन्याच्या मध्यापर्यंत विभागनिहाय झालेली पेरणी हेक्‍टरमध्ये अशी : 
कोकण - 13 हजार, नाशिक - 52 हजार, 
पुणे - एक लाख 51 हजार, औरंगाबाद - एक लाख 56 हजार, 
लातूर- 56 हजार, अमरावती - तीन लाख 32 हजार, 
नागपूर - 22 हजार. 

75 तालुक्‍यांत 33 हजार हेक्‍टरचे नुकसान 

निसर्ग चक्रीवादळामुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील 75 तालुक्‍यांतील 33 हजार 38 हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. हे नुकसान 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT