light.jpg 
नाशिक

खूषखबर : महाराष्ट्रात वीज झाली स्वस्त...प्रती युनीटमागे 'इतक्या' पैशांची बचत!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : महानिर्मिती कंपनीच्या मेरीट ऑर्डर डिस्पॅच् (MOD) निकषानुसार विविध उपायोजनातून औष्णीक वीज निर्मिती केंद्रामधील संचाच्या अस्थिर आकारात ९.३२ टक्के कमी करण्यात यश आले आहे. दर्जेदार कोळसा, कोळसा वाहातूकीचे घटविलेले अंतर यासह इतर अनेक कारणामुळे प्रती युनीट २० ते २२ पैसे वीजेचे दर घटविण्यात महानिर्मिती कंपनीला यश आले आहे.

कोरोनामुळे ११ संच बंद

महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता १३१८६ मेगावॅट असून त्यापैकी औष्णिक (९७५०) मेगावॅट, जल विद्युत (२५८०) मे. वॅट व वायू विद्युत (६७२) मेगावॅट तर सौर विद्युत (१८४) मेगावॅट क्षमता आहे. महानिर्मितीचे एकुण २८ संचांपैकी १५ संचातून ५८७९ मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी कमी असल्याने ३४६० मेगावॉट क्षमतेचे ११ संच बंद आहेत, संपूर्ण लॉकडाउनच्या काळात जून अखेर १० ते १२ संच सातत्याने सुरु होते.

६ हजार मेगॉवट निर्मती शक्य

महानिर्मिती कंपनीला ७० टक्के कोळसा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून घेत, वीज निर्मिती खर्च कमी करण्यासाठी चांगल्या प्रतीचा कोळश्यासोबतच कमी अंतराच्या खाणीतून कोळसा मिळविण्याचा प्रयत्न झाला. अशा
विविध प्रयत्नामुळे महानिर्मिती कंपनीला जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात औष्णीक वीज निर्मिती केंद्रातील राज्यातील सरासरी एकुण वीज निर्मिती खर्च ९.३२ टक्के कमी करण्यात यश आले. वीज निर्मितीचा अस्थिर आकार ९.३२% पर्यंत कमी करण्यात यश आल्याने माहे जूलै महिन्यामध्ये MOD नुसार महानिर्मितीचे २० ते २२ औष्णिक वीज निर्मिती संच कार्यरत राहून ६००० मेगावॉटपेक्षा जास्त वीज निर्मिती करणे शक्य होणार आहे.

महानिर्मितीच्या संचनिहाय अस्थिर आकार (रुपयात)
                            जून                जुलै घट        (टक्के)

खापरखेडा संच ५     २.४२३०           २.००७५         १७.१५%
खापरखेडा १ ते ४     २.८२४०          २.२१८६          २१. ४४ %
चंद्रपूर संच ३ ते ७     २.७६९०         २.४२५५          १२. ४१ %
चंद्रपूर संच ८,९         २.५४७०         २.3३१५१        ९.१०%
कोराडी संच ८,१०       २.९५००        २.७६५५          ६.२५%
पारस संच 3,४           २.८६२०        २.६२५०          ८.२८%
भुसावळ संच ४,५        ३.१२००       २.८४५६         ८.७९% 
परळी संच ८              ३.१४००        २.९८३३        ४.९९%
परळी संच ६,७           ३.१७००         ३.००९६       ५.०६%
नाशिक संच ३ते ५       ३.९५००        ३.५९१९ ९.     ०७%

एकुण वीज निर्मिती खर्च ९.३२ % इतका कमी करण्यात यश आले.

विशेष प्रयत्न करून कोळशाचे दर कमी करण्यात यश आल्यामुळे वीज निर्मितीचा दर प्रति युनिट २० ते २२ पैसे कमी झाल्याचा अंतिम फायदा महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांना होण्यास मदत होणार आहे. - डॉ. नितीन राऊत (ऊर्जा मंत्री )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : वडिलांनी शेत विकून घर बांधायला ठेवले १४ लाख, १३ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये गमावले अन्... धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

SCROLL FOR NEXT