Teachers Election.jpg 
नाशिक

लॉकडाऊनमध्ये उपोषण?? असे काय घडले की त्यांच्यावर ही वेळ आली ?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / उमराळे : अनुदानासाठी पात्र घोषित, अघोषित, अंशतः अनुदानित शाळांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी चक्‍क घरातच असूनही कुटुंबियांसोबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आपल्या घरातच बसून केले. हे आंदोलन करण्यासाठी या शिक्षकांनी 1 मे अर्थात महाराष्ट्र राज्याचा हीरक महोत्सवी दिन अन जागतिक कामगार दिनाची निवड करत शासनाचे लक्ष त्यांच्या मागणीकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

विविध प्रलंबित प्रश्नांसाठी उपोषण
महाराष्ट्र राज्यभर या उपोषणात महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक/ कमवी शाळा कृती संघटनेने सक्रिय सहभाग नोंदविला. संघटनेने 13 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णयान्वये घोषित 1 हजार 638 व अगोदरच्या 146 घोषित उच्च माध्यमिक शाळांना 24 फेब्रुवारी 2020 रोजी 106 कोटी 74 लाख 78 हजार रुपये पुरवणी मागणीद्वारे मंजूर केले. हे अनुदान 1 एप्रिल 2019 पासून देय असून त्याचा मंजूर निधी शिक्षण आयुक्त यांच्याकडे वर्गही करण्यात आला पण निधी वितरणाचा आदेश काढलेला नाही. तसेच 20% अनुदान घेणाऱ्या शाळांचा वाढीव टप्पा, अघोषित शाळा घोषित करणे अशा विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आमदारांच्या सोबतीने सबंध राज्यातून उच्च माध्यमिक कृती संघटनेच्या सर्व राज्य, विभाग, जिल्हा, तालुका पदाधिकारी व शिक्षक बांधवांनी आपल्या कुटुंबांसोबत सहभाग नोंदविला. यामध्ये नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. यामध्ये शिक्षकांनी आपल्या घरात व घराच्या ओसरीत आपल्या कुटुंबासोबत एक दिवसीय उपोषण केले.

सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप
गेल्या 20 वर्षांपासून 1 रुपया वेतन मिळत नसतानाही विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम हे शिक्षक करत आहेत. सकाळची शाळा करून उरलेल्या वेळेत काही ना काही काम करून आपला चरितार्थ चालवीत होते. पण कोरोना ह्या महामारीमुळे लॉकडाऊन स्थिती निर्माण झाली. यामुळे हाताचे कामही गेले परिणामी गेल्या महिन्याभरापासून शिक्षकांची उपासमार होतेय. मानसिक ताण वाढलाय. शासन इतर घटकांकडे लक्ष देते पण विनाअनुदानित शिक्षकांना जाणून बुजून सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप होत आहे. शासनाने मंजूर अनुदान निधी वितरणाचा आदेश तात्काळ काढून न्याय मिळावा म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT