crime news sakal
नाशिक

Nashik Crime : महिलेची 3 तोळ्यांची पोत ओरबाडली

प्रतीक जोशी

Nashik News : सिन्नर शहरातील शिर्डी महामार्गावरील ज्वाला माता लॉन्स येथे लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत अज्ञात दुचाकीस्वारांनी ओरबाडून पळ काढण्याची घटना गुरुवारी (दि.11) सायंकाळच्या सुमारास घडली. (thief looted 3 tola gold jewellery of woman nashik crime)

गुळवंच येथील प्रतिभा विठ्ठल घुमरे (35) या आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी ज्वाला माता लॉन्स येथे आल्या होत्या. लग्नाला वेळ असल्याने मेकअप करण्यासाठी त्या विजय नगरातील गजानन चौक येथील पार्लरमध्ये जाण्यासाठी पाई निघाल्या होत्या.

विजयनगर परिसरातील भाऊसाहेब खुळे यांच्या घरासमोर त्या आल्या असता समोरून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्याजवळ येत दुचाकीचा वेग कमी केला. मात्र, काही कळण्याच्या आतच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भामट्याने प्रतिभा यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रतिभा यांनी प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, दोघे भामटे दुचाकीवरून सुसाट वेगाने पसार झाले. प्रतिभा यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. सिन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनीही तात्काळ घटनास्थळी येत पाहणी केली.

मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरा प्रतिभा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय माळी हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT