theft 12345.jpg 
नाशिक

मामाचा पाहुणा असल्याचे सांगत थेट घरात जाऊन मारला डल्ला; 'असा' घडला प्रकार

राजेंद्र अंकार

नाशिक/ सिन्नर : ‘मी गणू मामाचा पाहुणा आहे’, असे सांगत ‘पैसे कुठे ठेवले आहे’ असे विचारत बेडरूम मध्ये जात कपाटाजवळ गेला.जनावरांना चारा टाकून चंद्रकला या घरात आल्या असता, पाहुणा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि धक्काच बसला.

काय घडले नेमके?

बुधवारी (ता. ५) सायंकाळी दुचाकीवरून एक ३० वर्षीय कोकाटे यांच्या घरी आला. त्यावेळी घरात तुषार यांची आई चंद्रकला व आठवीत शिकणारा मुलगा गौरव असे दोघेच होते. ‘मी मामाचा पाहुणा आहे’, असे सांगत त्याने चंद्रकला यांच्याशी बोलायला सुरवात केली. सूनबाईच्या भावाचे नावही तेच असल्याने ‘मी जनावरांना चारा टाकून येते’, असे सांगत चंद्रकला जनावरांच्या गोठ्याकडे वळल्या. घरात टीव्ही बघत असलेल्या गौरवला, ‘मी गणू मामाचा पाहुणा आहे’, असे सांगत ‘पैसे कुठे ठेवले आहे’ असे विचारत बेडरूम मध्ये जात कपाटातील एक लाख २० हजारांची रक्कम घेऊन फरारी झाला.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जनावरांना चारा टाकून चंद्रकला या घरात आल्या असता, पाहुणा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाहुण्याबाबत त्यांनी नातू गौरवला विचारत आतल्या खोलीत गेल्या असता, कपाट उघडे दिसले. त्याचदरम्यान श्री. कोकाटे घरी आले. आईने घडला प्रकार सांगितला. त्यांनी कपाट तपासले असता, आतल्या कप्प्यात एक लाख २० हजार रुपये असलेली पिशवी गायब असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी कोकाटे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

अडीच लाख वाचले
कोकाटे यांनी सिन्नरच्या आंध्र बँकेतून एक लाख २० हजार रुपये काढून आणून घरातील कपाटात ठेवले होते. तीच रक्कम चोरीला गेली. याच कप्प्यात त्यांनी दोन लाख ४० हजार रुपयेदेखील दुसऱ्या पिशवीत ठेवले होते. चोरट्याने थोडा पुढे हात घातला असता, तर ही रक्कमदेखील त्याच्या पदरात पडली असती. केवळ नशिबाने कोकाटे यांचे नुकसान टळले.

भामट्याने साधली संधी

आजी व नातू घरात एकटेच असल्याची संधी साधत भामट्याने, ‘मी गणू मामाचा पाहुणा आहे’, अशी बतावणी करत घरातील कपाटात ठेवलेले सव्वा लाख रुपये चोरून नेल्याची घटना सोमठाणे (ता. सिन्नर) येथे घडली. सोमठाणे शिवारात मेंढी रस्त्यालगत तुषार कोकाटे यांच्या वस्तीवर प्रकार घडला.

संपादन - ज्योती देवरे

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT