A captive female leopard in Navale farm. esakal
नाशिक

Nashik Leopard News: नवले मळ्यात वर्षभरात तिसरा बिबट्या जेरबंद

अनेक दिवसांपासून पाथर्डी ग्रामस्थांची झोप उडवणारी मादी बिबट्या मंगळवारी (ता. २६) रात्री अकराच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : अनेक दिवसांपासून पाथर्डी ग्रामस्थांची झोप उडवणारी मादी बिबट्या मंगळवारी (ता. २६) रात्री अकराच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

विशेष म्हणजे एका वर्षात गट क्रमांक २१६ मधील नवले मळ्यात हा तिसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे. (Third leopard jailed in year in Navle mala Nashik News)

२० नोव्हेंबर २०२२ ला २ वर्षे वयाचा नर आणि मागील महिन्यात याच ठिकाणी ७ वर्षे वयाचा नर बिबट्या पकडला होता.

या ठिकाणी असलेल्या नाल्याच्या उतारावर बिबट्याचे ठसे आढळून आल्याने तसेच काहींना प्रत्यक्ष दर्शनदेखील झाल्याने वनविभागाला माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पिंजरा लावला होता.

रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती वन विभागाला भाऊसाहेब नवले आणि ग्रामस्थांनी दिली. बुधवारी सकाळी वनपाल अनिल अहिरराव आणि सहकाऱ्यांनी हा पिंजरा येथून हलवला. दरम्यान याच ठिकाणी पुन्हा बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.

त्यामुळे अजून एक बिबट्या या भागात खात्रीलायक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, त्या दृष्टीने वन विभागदेखील पाहणी करत आहे. जेरबंद करण्यात आलेल्या मादी बिबट्याचे वय पाच वर्षे असल्याचे अहिरराव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT