11th admissions process
11th admissions process esakal
नाशिक

Nashik 11th Admission : या वर्षी अकरावीच्या 26 हजार 720 जागा; सतराशेंनी भरला भाग दोन

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : येथील नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत एकूण २६ हजार ७२० जागा उपलब्‍ध असणार आहेत.

दरम्‍यान आत्तापर्यंत १५ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून, यापैकी एक हजार ७२६ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरत महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविला आहे. (This year 26 thousand 720 seats of 11th admission nashik news)

शिक्षण विभागातर्फे राज्‍यभरातील प्रमुख महापालिका क्षेत्रांमध्ये ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. त्‍यानुसार सध्या पहिल्‍या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. काल (ता.७) पर्यंत महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्‍ध जागांची नोंदणी करण्याची मुदत दिलेली होती.

यानंतर प्रवेश क्षमतेची आकडेवारी समोर आली असून, एकूण २६ हजार ७२० जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध असणार आहेत. दरम्‍यान दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची नोंदणी व अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

आत्तापर्यंत १५ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. तर गुरुवार (ता.८) पासून अर्जाचा भाग दोन भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. पहिल्‍याच दिवशी १ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अर्जासाठी अंतिम मुदत अशी

पहिल्‍या नियमित फेरीसाठी अर्जाचा भाग एक भरण्याची अंतिम मुदत १२ जून अशी निश्‍चित केली आहे. तर अर्जाचा भाग एक भरून यशस्वीरीत्या पडताळणी प्रक्रिया पूर्ण केलेल्‍या व हा अर्ज लॉक केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालय व शाखांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. भाग दोन भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. १९ जूनला पहिली निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.

आकडे बोलतात...

* नोंदणीकृत विद्यार्थी संख्या---१५ हजार ३३९

* कॅप राउंडसाठी नोंदणी---------१ हजार ७२६

* कोट्या जागांसाठी नोंदणी-----३४९

* कॅपद्वारे उपलब्‍ध जागा--------२२ हजार ०६३

* कोट्यातून उपलब्‍ध जागा------४ हजार ६५७

* एकूण उपलब्‍ध जागा-----------२६ हजार ७२०

* एकूण महाविद्यालय संख्या---६४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT