maize Google
नाशिक

येवला बनले मकाचे आगार! जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : हमी भावाने होणारी खरेदी आणि समाधानकारक उत्पन्न निघत असल्यामुळे दुष्काळी येवलेकरांचा मकाकडे कल वाढला असून, कांद्यापाठोपाठ सर्वाधिक क्षेत्र मकाखाली गुंतवले जात आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक मकाची पेरणी येवला तालुक्यात झाली असून, कांद्यापाठोपाठ तालुका मकाचे आगार बनत आहे.

आतापर्यंत तालुक्यात खरिपाची ९१ टक्क्यांवर पेरणी पोहोचली असून, पूर्व भागात सुरवातीपासून पावसाने साथ दिल्याने पिके जोमात आहेत. तर पश्‍चिम भागातील काही गावांत मात्र १५ ते ३० दिवस पेरणीला उशीर झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

भौगोलिकदृष्ट्या तालुका नेहमीच दोन भागांत विभागला जातो. यंदाही असेच झाले असून, निफाडलगतच्या पश्‍चिम पट्ट्यात जोरदार पाऊस असतो. तर औरंगाबाद सीमेलगतच्या डोंगराळ पट्ट्यात पाऊस नेहमीच परीक्षा घेतो. या वर्षी सुरवातीला अवर्षणप्रवण पूर्व भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी १० ते २० जूनच्या दरम्यान पेरण्या उरकल्या होत्या. याउलट पश्‍चिम पट्ट्यात पावसाने ताण दिल्याने ११ जुलैदरम्यान व त्यानंतर उशिरापर्यंत पेरण्या सुरू होत्या. त्यामुळे पूर्व भागातील पिके जोमात असून, मका डोक्यापर्यंत बहरल्या आहेत. मुगालाही शेंगा लागल्या, तर सोयाबीन त्याच अवस्थेत आहे. याउलट पश्‍चिम भागातील पेरण्या उशिरा झाल्याने उशिरा पेरणी झालेली पिके जमिनीलगतच आहेत. असे असले तरी संपूर्ण तालुक्यातील पिके अधूनमधून येणाऱ्या सरी व हलक्या पावसामुळे जोमात असून, यापुढे जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

तालुक्‍यात मकाची तब्बल ४० हजार ५५७ हेक्‍टरवर (१३३ टक्के) पेरणी झाली आहे. बाजरी, मूग, तूर, भुईमूग तसेच कापसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. उलट सोयाबीनचेही क्षेत्र वाढले असून, दहा हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पाऊस लांबल्याने मुगाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटून अवघ्या आठ हजार ४०० हेक्टररवर मूग पेरणी झाली आहे. असे असले तरी मुगासह राखीव ठेवलेल्या शेतात कांदा लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी चालवली असून, त्यासाठी रोपे ही टाकली आहेत.

मकाला एक हजार ८७० रुपये प्रतिक्‍विंटल शासकीय हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने वर्षागणिक क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात तब्बल दोन लाख २९ हजार हेक्टरवर मकाची पेरणी झाली असून, येवल्यापाठोपाठ मालेगाव (४० हजार हेक्टर), नांदगाव (२९ हजार), बागलाण (३६ हजार) या तालुक्यातही सर्वाधिक मका लागवड झाली आहे.

येवल्यात आतापर्यंत झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)

पिके - सरासरी क्षेत्र - पेरणी - टक्केवारी

बाजरी -१०८५१ - ६६०८ - ६०.९

मका - ३०४७२ - ४०५५७ - १३३

तूर - १२७२ - ३२१ - २५.२४

मूग - १८४०४ - ८४६३ - ४५.९८

उडीद - ४७४ - १२४ - २६.१६

भुईमूग - २४४३ - २५६० - १०४

सोयाबीन - ३७५२ - १००४२ - २६७

कापूस - १२००६ - ४०२३ - ३३.५१

एकूण - ७९६८७ - ७२७१४ - ९१.२५

पूर्व भागात आजच्या स्थितीला पिके जोमात असून, मका डोक्यापर्यंत आली आहे. सोयाबीनही जोमात आहे. याउलट पश्‍चिम भागातील मुखेड, महालखेडा, चिंचोडी परिसरात दुसऱ्या टप्प्यातील पावसानंतर पेरणी झाल्याने पिके अजून छोटी आहे. एक महिना पेरणी उशीरा झाल्याने व पुरेसा पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. असेच वातावरण राहिल्यास पिकांच्या उत्पादनात ५० टक्के घट होईल.

- नितीन काबरा, शेतकरी व कृषी निविष्ठा विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात पाणीटंचाईचा कळस! रागावलेल्या ग्रामस्थांचा मनसेसोबत मटकाफोड आंदोलन

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

SCROLL FOR NEXT