Farmers protesting under the leadership of Yatin Kadam on Monday to get the due amount from the market committee. esakal
नाशिक

Nashik News: 22 लाखांसाठी शेतकऱ्यांचा ‘ठिय्या’! बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो विक्रीनंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोख पेमेंट देण्याचा नियम आहे, पण टोमॅटो विक्री करून तीन महिने उलटूनही डीकेजी फर्मचे व्यापारी देवेंद्र सोनी यांनी शेतकऱ्यांचे २२ लाख रुपये थकविले आहेत.

या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांच्या नेतृत्वाखालील सोमवारी (ता. १८) बाजार समितीत सचिवांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

येत्या पाच दिवसांत थकीत रक्कम न मिळाल्यास बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (Thiyya andolan of farmers for 22 lakhs Bazar Committee warned to strike Nashik News)

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत व्यापारी देवेंद्र सोनी यांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केला. शेतकऱ्यांची काही रक्कम अदा केली, पण शेतकऱ्यांचे तब्बल २२ लाख रुपये थकविले.

अगोदरच बाजारभाव गडगडले असताना, मातिमोल भावात टोमॅटोची विक्री करावी लागली. त्यात शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांनी थकविल्याने दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे.

१५ दिवसांपूर्वी यतीन कदम यांनी बाधित शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याची बैठक घेतली. तीत आठ दिवसांत थकीत रक्कम देण्याचे व्यापाऱ्याने मान्य केले. मुदत संपूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले.

बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीचे सचिव संजय लोंढे यांच्या दालनात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. सचिव लोंढे यांनी सभापती तथा आमदार दिलीप बनकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.

श्री. कदम व आमदार बनकर यांच्यात संवाद झाला. आठवड्याभरात थकीत रक्कम देण्यास व्यापाऱ्याला तंबी देण्याचे आश्वासन सभापती बनकर यांनी दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

शेतकरी ओमकार मोरे, बाळासाहेब धुमाळ, शरद आहेर, माधव खैरे, राहुल रकिबे, मयूर रकिबे, सुरेश धुमाळ, दत्तू रकिबे, किरण कुयटे, रोहित जगताप, संजय आहेर, प्रवीण आहेर, रोहित जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

"पिंपळगाव बाजार समितीत रोख पेमेंटचा नियम असताना, शेतकऱ्यांचे पैसे महिनोमहिने थकविले जातात. याविरोधात आवाज उठविला आहे. येत्या आठवड्यात थकीत रक्कम न मिळाल्यास बाजार समितीला टाळे ठोकू."

-यतीन कदम, संचालक, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT