Water fountains are flying on Thursday due to the leakage of a water pipeline in the area. esakal
नाशिक

Nashik News : खडकाळी चौकात पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक (जि. नाशिक) : जुने नाशिक भागाला पाणीपुरवठा करणारी खडकाळी परिसरातील मुख्य पाईप लाईन फुटून गळती लागण्याची घटना गुरुवारी (ता. २९) सायंकाळी घडली. सायंकाळी पाणीपुरवठा होताच पाण्याचा सुमारे सात ते आठ फुटाचा फवारा उडताना दिसून आला. गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (Thousands of liters of water wasted due to pipeline burst in Khadkali Chowk Nashik News)

जीपीओ जलकुंभ ते खडकाळी परिसरापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी १३ इंची मुख्य पाईपलाईन टाकण्यात आली आहे. सुमारे ५० ते ६० वर्ष जुनी पाईपलाईन असल्याने पाईप अतिशय निकृष्ट झाले आहे. गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा होताच पाण्याचा दाब वाढल्याने अचानक पाईपलाईन फुटून परिसरात फवारे उडण्यास सुरवात झाली.

त्यात हजारो लिटर पाणी वाया जात परिसरात पाण्याचे तलाव निर्माण झाले होते. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी महापालिकेस माहिती दिली. परंतु पोलीस ठाण्याप्रमाणे महापालिका विभागीय कार्यालयांच्या हद्दीच्या वादातून सुमारे दोन ते तीन तास पाणी वाया जात राहिले. कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही.

परिसरातील सामाजिक कार्यकर्ते असलम खान यांनी पश्चिम विभागाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिले. रात्री उशिरापर्यंत पाणी वाया जात होते. जीपीओ जलकुंभाचा कॉक बंद करण्यात आल्यानंतर पाणी वाया जाणे बंद झाले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

पाणीपुरवठा बंद झाल्याने परिसरात सायंकाळचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. रहिवाशांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागले. पाण्याचा वारंवार तक्रारी जात असल्याने अखेरीस पश्चिम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पाईपलाईनची दुरुस्ती केली. नागरिकांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध करून नाराजी व्यक्त केली.

येथेही हद्दीचा वाद

पोलीस विभागात तक्रार घेण्यावरून हद्दीचा वाद झाल्याचे ऐकावयास मिळाले आहे. परंतु महापालिका विभागीय कार्यालयाकडून देखील हद्दीचा वाद केला जात असल्याचे गुरुवारी घडलेल्या घटनेतून स्पष्ट झाले.

पश्चिम विभाग पूर्व विभागाकडे तर पूर्व विभाग पश्चिम विभागाकडे बोट दाखवत फुटलेली पाईपलाईनचे ठिकाण त्यांच्या हद्दीत येत नसल्याचे सांगत होते. त्यामुळे उशिरापर्यंत फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती होऊ शकली नाही. हजारो लिटर पाणी वाया गेले. रहिवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सासवडमध्ये भाजपाचा डबल धमाका; प्रभाग २ आणि ९ पूर्णपणे भगवे

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

U19 Asia Cup India Pakistan: कुमारांनाही आशिया कप जिंकण्याची संधी; पाकिस्तानविरुद्ध आज अंतिम सामना, भारताचे पारडे जड

SCROLL FOR NEXT