Thousands of tribal families in search of work nashik sakal news 
नाशिक

हजारो आदिवासी कुटुंबांचे उपनगरांत बस्तान; शेतीची कामे हाच एक आधार

राम खुर्दळ

नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील वाडा, पळसण (गुजरात) खरशेत, ओझरखेडे,
देवडोंगरा, ठाणापाडा, हरसूल व पेठ तालुक्यातील हजारो आदिवासी मजूर रोजगारासाठी उपनगराच्या चौफुलीवर रस्त्यावर आपले बस्तान टाकून रोजगारासाठी आलेले आहेत. कोरोनाच्या काळात मेटाकुटीला आलेला आदिवासी भागातील मजूर हजारोंच्या संख्येन आता शेतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगारासाठी उपनगरांत दाखल झाला आहे.

या मजूरांमध्ये युवकांचा सहभाग अधिक असून सध्या टोमॅटो बांधणी, फवारणीसाठी, खते टाकण्यासाठी, सरी ओढण्यासाठी, टोमॅटो खुडणीसाठी व पुढील महिन्यात होणाऱ्या द्राक्षाच्या ऑक्टोंबर छाटणीसाठी ही मंडळी गिरणारेच्या चौफुलीवर आली असून जागेवर येऊन शेतकरी या मजुरांना शेतातील कामांसाठी घेऊन जात आहेत.

शेतीतील कामे का एकमेव रोजगार

दरवर्षी उशिरा होणारे आदिवासी मजुरांचे रोजगारासाठीचे स्थलांतर यंदा सप्टेंबरमध्येच सुरू झाले आहे. या स्थलांतरित आदिवासी भागातील मजुरांना एकमेव शेती व्यवसायाचामुळे रोजगार मिळत असतो, गिरणारे गावाच्या चौफुलीवर जमणारे हे आदिवासी मजुरांचे टोळके त्यांना जागेवर येऊन शेतकरी कामाचा रोजगार ठरवतात स्वतःचे वाहनाने शेतवस्तीवर निवासी ठेवून त्यांच्याकडून शेतीची दैनंदिन कामे करून घेतली जातात, यामध्ये बहुतेक मजुरांचे गटाचे प्रमुख त्यांचे रोजगार ठरवतो.तर काही।मजुरच कामाच्या नुसार आपला रोजगार ठरवतात, या आदिवासी मजुरांमध्ये बहुतेक शाळकरी मुले,व युवक असतात, शाळा शिकून रोजगार ही कमावतात. सोबत लाकूडफाटा, किंवा गैस सिलेंडर, किराणा, धान्य पोटापाण्याचे साहित्य, अंथरूण, पांघरूण, कपडे घेऊन ही मंडळी रोजगारासाठी आपले गाव सोडून कामाला उपनगरांत शेत वस्तीवर चार ते सहा महिने कामाला जातात. केवळ सणासुदीला गावी येतात, आदिवासी भागात शेतीतील एकमेव रोजगारामुळे आदिवासी मजुरांच्या हातात रोख रक्कम येत असते, प्रसंगाला काहीवेळा विश्वासू शेतकरी उसनवारीने उचल रक्कम ही देतात.

कोरोनाच्या काळात मजुरांना रोजगार

दरम्यान यंदाच्या काळात कोरोना महामारीमुळ द्राक्ष काढनीत भीतीने आपले काम सोडून गावी परतलेल्या मजुरांना हातात रोजगाराची कमाई नव्हती, त्यामुळं आदिवासी भागात पोटापाण्याचा मोठा गंभीर प्रश्न होता, मात्र यंदा समाधानकारक पावसामुळं शेतीतील कामासाठी दुरदूरहून आदिवासी भागातून बहुसंख्य लोक कामासाठी उपनगरांत आले आहेत. गिरणारेच्या चौफुलीवर आलेले मजुरांना पिंपळगाव बसवंत, सिन्नर, नाशिकरोड, भगूर मातोरी, सिद्ध पिंप्री व दुगाव गिरणारेत मोठ्या प्रमाणात हे मजूर शेती कामासाठी जातात. कोरोनाच्या काळात एकमेव शेतीने मजुरांना हक्काचा रोजगार दिल्याने शेतीकडे शासनाने मुख्य उद्योग म्हणून अधिक लक्ष द्यावे अशी मागणीच शेतकरी संघर्ष संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाना बच्छाव यांनी केली आहे.

माझी घरची कोरडवाहू शेती आहे गावात रोजगाराची साधने नसल्याने दरवर्षी मी शेतमजुरीला नाशिक तालुक्यात शेतीत राबतो, त्यातील कमाईवर आमचे पोटपाणी चालते, रोजगार हमी योजनेत रोज कमी कामही वेळेत मिळत नाही, त्यामुळं आम्हाला गाव सोडून दूरवर पोटासाठी यावं लागत, आम्हाला शेतकरीच पोसतो. -हिरामण रिंजड (गावंध गाव ता.पेठ) शेतमजूर

माझ्या गावात येणारा आदिवासी मजूर याला हक्काचा रोजगार मिळतो तो ही केवळ शेती व्यवसायात मजूरांना शेती व्यवसाय भरभरून देतो, मात्र पिकवणारा शेतकरी मात्र अनिश्चित बाजारभावमुळे प्रसंगी देशोधडीला लागतो, करणार काय? शासनाने शेतीला किमान उत्पादनधारित किंमत दिली तर आमची वणवण थांबेल, शेतकऱ्यांची शिकलेली पोरं नोकरीला कुठं लागतात हो, नोकऱ्या मिळतातच कुठं? आम्हाला शेतात राबाव लागत, तेव्हाच मजुराला रोजगार व आम्हाला ही दोन पैसे मिळतात, मात्र कधी तर बाजारभाव कोसळला तर आमचे कर्ज आम्हाला छळतात. जगाचा पोशिंदा अन्नदाता प्रसंगी उपाशी राहील पण देणी मात्र फेडतो सर्वाना अन्न रोजगार देतो... -अनिल थेटे (शेतकरी)

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT