auto2.JPG 
नाशिक

नाशिककरांनो! रिक्षाने प्रवास करत असाल तर सावधान; दिवसभरात तीन धक्कादायक घटना समोर

विनोद बेदरकर

नाशिक : पोलिसांच्या कारवाया सुरु असल्या तरी, चोरट्यांच्या विविध क्लुपत्या लढवून चोर्‍या, लूटमार सुरुच आहेत. अशाच प्रकारे रिक्षात प्रवाशी बसवून त्यांचे मोबईल तसेच रोकड लंपास करत लूटल्याचे शुक्रवारी (ता. 8) एकाच दिवशी थोड्या अंतराने तीन चोरीचे प्रकार समोर आले आहेत. वाचा सविस्तर प्रकार

दिड हजाराची रोकड व दोन मोबाईल गायब

गंगापूररोड ते निमाणी बसस्थानकादरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्वास पवलु आहिरे (48, रा. पिंपळनेर, ता. साक्री, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आहिरे कामानिमित्त गंगापूर रोड परिसरात आले होते. येथील टकले नगरपासून ते निमाणी बसस्थानक जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करत असतांना, त्यांच्या बाजुला तीन संशयितांनी खिशातील दिड हजाराची रोकड व दोन मोबाईल गायब केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली आहे. 

त्याच रिक्षातील दुसरी घटना 

निमाणी बसस्थानक ते आडगाव नाका दरम्यान घडली. याप्रकरणी राजेंद्र खंडेराव देशमुख (35, रा. देशमुख वस्ती, आडगाव, नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास देशमुख हे निमाणी बसस्थानकातून एका रिक्षात बसले होते. त्यांच्याबरोबर बसलेल्या दोघांनी त्यांच्या खिशातील दोन मोबाईल लंपास केले. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तिसरी घटना 

सव्वातीन वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालय ते दक्षिणमुखी हनुमान मंदिरादरम्यान घडली. याप्रकरणी मनोही हनुमंतराव कावळे (72, रा. पाटिलनगर, नवीन नाशिक) यांनी तक्ररा दाखल केली आहे. त्यानुसार ते सिडको येथे जाण्यासाठी जिल्हा रूग्णालयापासून एका रिक्षात बसले. यामध्ये चालकासह बसलेल्या तिघांनी त्यांच्या खिशातील पैशांचे पाकिट लंपास केले. याप्रकरणी कावळे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT