trimbak baby 123.jpg 
नाशिक

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! ३ महिन्याचे लेकरू गटाराच्या कडेला फेकताना त्यांचे हात नसतील का थरथरले?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मातृत्व लाभणं हा एकप्रकारे स्त्रीला निसर्गाकडून लाभलेला आशिर्वादच असतो. काही लोकं या बाबतीत कमनशिबी असतात. तर काहीं लोकांना याची किंमत नसतो. हे लोकं या गोष्टींचा अक्षरश: गैरफायदा घेऊन जन्माला येणाऱ्या नव्या जीवाचे हाल करतात. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात घडली आहे. 

मन हेलावून टाकणारी घटना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात  

नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गालगत असलेल्या आधारतीर्थ आश्रमच्या समोर तुपादेवी फाटा या ठिकाणी (ता.१२) मध्यरात्री २ च्या सुमारास एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. यावेळी समोरील आश्रमात झोपलेल्या अनाथ मुलांना या लहान बाळाचा आवाज आला. त्यानंतर त्या मुलांनी आपल्या मित्रांना झोपेतून उठवले. या अनाथ आश्रमात सांभाळ करणाऱ्या मावशींसोबत त्या मुलांनी गेटच्या बाहेर जाऊन पाहिले. त्यावेळी रस्त्याच्या कडेला गटाराच्या बाजूला एक निरागस बाळ रडत असल्याचे त्यांना दिसले.  या बाळाला रस्त्याच्या कडेला अक्षरश: फेकून दिले होतं. आणि त्या बाळाला जणू भूक लागली असावी तसे हे बाळ जोरजोरात रडत होतं. त्यानंतर....

चिमुरड्याला आश्रमात आणून दूध पाजले

या घटनेची माहिती तात्काळ आधार आश्रमातील अध्यक्षांना कळवत नाशिक पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. तर सुदैवाने मध्यरात्रीच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या पी. एस. आय. अश्विनी टिळे पेट्रोलिंग करत होते. त्यानंतर त्यांनी तातडीने तुपादेवी फाट्याकडे धाव घेत आश्रम गाठलं. यानंतर त्या आश्रमातील महिलेने त्या चिमुरड्याला आश्रमात आणून दूध पाजले. यानंतर पी.एस.आय अश्विनी टिळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना करत तात्काळ बाळाला त्र्यंबकेश्वर रुग्णालयात हलवण्यास सांगितले. 

बाळाच्या आईचा शोध
यानंतर डॉक्टरांनी या बाळाची तपासणी करुन त्याची प्रकृती नीट असल्याची माहिती दिली. या घटनेनंतर या बाळाला बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले. यानंतर त्या बाळाला घारपुरे घाट येथील आधार आश्रमात ठेवण्यात सांगितलं आहे. मात्र त्र्यंबकेश्वर पोलीस या बाळाच्या आईचा शोध घेत आहेत. दरम्यान या घडलेल्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT