corona
corona  File Photo
नाशिक

परिस्थिती गंभीर! कोरोनामुळे आठ दिवसांत तीन शिक्षकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जुनी शेमळी (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील तीन प्राथमिक शिक्षकांचा आठ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब कोलमडले आहे. प्रत्यक्ष जाऊन सांत्वन करता येत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक दुःख व्यक्त करत आहेत.

तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, दिवसागणिक परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णालयांमधील बेड, रेमडेसिव्हिरची कमतरता पाहता आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अनेक कुटुंबांतील सदस्य बाधित होऊन अनेकांचा बळी जात आहे. त्यामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. आठ दिवसांत मुंजवाड येथील प्राथमिक शिक्षक मुरलीधर पवार (वय ४५), जुने रातीर येथील पोपट शिंदे (५७), सटाणा येथील विजय पगार (४५) यांचा मृत्यू झाला. अर्धवट नोकरी, संसाराचा गाडा चालविणारा व घरातील कमावणारा कर्तबगार मुलगा कोरोनाने हिरावून घेतल्याने हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT