dam death.jpg 
नाशिक

दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिडको) सुट्टीची मज्जा घेण्यासाठी चार मित्रांची धरणाकडे धाव...पोहण्याचा मोह न आवरणं हीच मोठी ठरली चूक...तिघांनी घेतला मस्त पाण्यात पोहण्याचा आनंद. गणेशला पाण्याची भीती म्हणून तिघा मित्रांनी त्याला हिणवलं देखील...पण काय माहित होतं काळ तिथंच होता दगा धरुन अन् तेवढ्यात 

धक्कादायक घटना...

वालदेवी धरणावर पोहोण्यासाठी गेलेल्या सिडकोतील तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सिडको परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. वैभव पवार (वय २७ रा. श्रीराम मंदिर चौक, उत्तमनगर), महेश लाळगे (वय ३० रा. पवन नगर), महेश बागुल (वय ३५ रा. पाथर्डीफाटा) अशी या मृत युवकांची नावे आहेत. या घटनेची नोंद वाडीवऱ्हे पोलिसांत झाली आहे. 

असा आहे प्रकार

वैभव पवार, महेश लाळगे आणि महेश बागुल हे शनिवारी (ता.18) दुपारी वालदेवी धरणावर गेले होते. तिघेही पोहण्यासाठी पाण्यात उतरले परंतु तिघांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने एकमेकांना वाचवताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन - चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत त्यांचा चौथा मित्र गणेश जाधव (वय २९) हा पाण्यात उतरला नसल्याने वाचला. मयत पवार हा पुणे येथे एम.ई.चे शिक्षण घेत होता तर मयत बागुल हा मुंबई येथे पोलिस दलात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेनंतर सिडको परिसरात हळहळ व्यकत करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT