thrill of burning bike in Nandgaon market Yard Nashik News esakal
नाशिक

बाजार समितीत ‘बर्निंग बाईक’चा थरार | Nashik

संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : येथील बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. १९) दुपारी झाडाखाली उभ्या असलेल्या ‘बर्निंग बाईक’ (Burning Bike) चा थरार बघावयास मिळाला.

बाजार समितीच्या (Market Yard) कार्यालयाजवळ जॉन सुनील वाघ नामक तरुणाने आपली दुचाकी लावली होती. थोड्या वेळेनंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. दुचाकीला लागलेली आग बघण्यासाठी एकच गर्दी उसळली. मात्र, स्फोट होईल या भीतीमुळे सुरवातीला कोणीही आग विझविण्यासाठी धजवले नाही, पण नंतर टाकीतील पेट्रोल (Petrol) पेट घेण्यापूर्वीच प्रशांत इघे, किरण घुगे या युवकांनी धाडस दाखविले. हातात पाण्याच्या बादल्या घेत पाण्याचा मारा करून आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आजही उन्हाची काहिली होती. उष्णतेमुळे दुचाकीला आग लागल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. दुचाकींचा क्रमांक कळू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT